शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

लोकजनशक्ती पक्षातील घडामोडींवर चिराग पासवान पहिल्यांदाच बोलले, भावूक होऊन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 4:33 PM

Chirag Paswan News: काका पशुपती पारस यांनी केलेली बंडखोरी आणि इतर नेत्यांकडून त्याला मिळालेली साथ यावर चिराग पासवान यांनी मौन सोडत प्रथमच भाष्य केलं आहे.

पाटणा - स्वपक्षीय आणि कुटुंबीयांनीच दगाबाजी करून पक्षावर कब्जा केल्याने दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान, काका पशुपती पारस (Pashupati Paras) यांनी केलेली बंडखोरी आणि इतर नेत्यांकडून त्याला मिळालेली साथ यावर चिराग पासवान (Chirag Paswan ) यांनी मौन सोडत प्रथमच भाष्य केलं आहे. या घटनाक्रमावर बोलताना चिराग पासनाव यांनी भावूक होत पक्ष आणि कुटुंबाला एकजूट ठेवण्यात आपण अपयशी ठरलो, असे म्हटले आहे.  (Chirag Paswan spoke for the first time on the developments in the Lok Janshakti party)

चिराग पासवान यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काका पशुपती पारस यांना लिहिलेली काही पत्रे शेअर केली आहेत. दरम्यान, या ट्विटमध्ये चिराग पासवान म्हणाले की, माझ्या वडलांनी स्थापन केलेला हा पक्ष आणि माझ्या कुटुंबाला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न मी केला. मात्र त्यात मी अयशस्वी ठरलो. पक्ष हा मातेसमान असतो. त्यामुळे आईची फसवणूक करता कामा नये. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मी आभार मानतो. 

गेल्या काही दिवसांत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये लोकजनशक्ती पक्षात मोठी उलथापालथ होऊन पक्षाची सर्व सूत्रे रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपती पारस यांच्या हाती गेली आहेत. पशुपती पारस यांना पक्षाच्या संसदीय दलाचा नेता निवडण्यात आले आहे. तर पक्षाच्या अध्यक्षपदावरून चिराग पासवान यांची उचलबांगडी करण्याची तयारीही सुरू आहे. दरम्यान, लोकजनशक्ती पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सूरजभान सिंह यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या पाच दिवसांत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. आता सूरजभान सिंह यांच्या अध्यक्षतेखालीच पक्षाची बैठक होईल. तसेच येणाऱ्या काही दिवसांत राष्ट्रीय कार्यकारिणीचीही बैठक आयोजित होणार आहे. 

टॅग्स :Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBiharबिहारPoliticsराजकारण