शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

‘’इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील प्रश्न मिटवा,’’ हिंदुत्वावरून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 2:56 PM

Nitesh Rane News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सातत्याने टीकेचे लक्ष्य करणाऱ्या नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देनितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या एका जुन्या वक्तव्याचा फोटो ट्विट करत उद्धव ठाकरे यांना सवाल विचारला आहेधर्मनिरपेक्षता संपलीय, आता भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे, असे विधान संजय राऊत यांनी केले होतेत्या विधानाचा आधार घेत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे

मुंबई - राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्वाच्या केलेल्या उल्लेखावरून वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मला कुणाकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे सांगत राज्यपालांना पत्राच्या माध्यमातून खरमरीत उत्तर दिले आहे. दरम्यान, आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सातत्याने टीकेचे लक्ष्य करणाऱ्या नितेश राणे यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या एका जुन्या वक्तव्याचा फोटो ट्विट करत उद्धव ठाकरे यांना सवाल विचारला आहे. धर्मनिरपेक्षता संपलीय, आता भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्या विधानाचा आधार घेत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. माननीय मुख्यमंत्री यालाही प्र्त्युत्तर देणार आहेत का? की हे नेहमीप्रमाणे निव्वळ राजकारण आहे. इतरांना दोष देण्याआधी स्वत:च्या घरातील प्रश्न सोडवा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं होतं असं उत्तरआपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात असल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी पत्रातून करुन दिली होती. महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्याचें हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated?  असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ  ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा Secularism आहे तो आपल्याला मान्य नाही का?  मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं होतं.शरद पवार यांनीही राज्यपालांच्या पत्राविषयी व्यक्त केली होती नाराजीराज्यपालांनी पाठवलेल्या या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीसारखी नाही तर राजकीय नेत्यासारखी आहे असा टोला पवार यांनी लगावला होता. तसेच शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यपालांबाबत तक्रार केली होती.या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची भाषा ही दुर्दैवाने राजकीय पक्षाच्या नेत्यासारखी आहे. हे पत्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्यासमोर आले आहे. या पत्रामधून राज्यपालांनी कोरोना काळात बंद असलेली मंदिरे सामान्य जनतेसाठी उघडण्याची सूचना केली होती. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण