शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

‘कंगना तो एक बहाना है’, सूचक ट्विट करत नितेश राणेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 1:10 PM

शिवसेना आणि कंगना यांच्यात पेटलेल्या वाकयुद्धावर नितेश राणेंचं सूचक भाष्य

मुंबई: अभिनेत्री कंगना राणौतनं मुंबईवरून केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. यावरून कंगना आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. या वादावर आता भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करून भाष्य केलं आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध कंगना पाठोपाठ शिवसेना विरुद्घ राणे असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.शिवसेना विरुद्ध कंगना वादावर नितेश राणेंनी अतिशय सूचक ट्विट केलं आहे. 'कंगना तर फक्त बहाणा आहे. सुशांत सिंह राजूपत आणि दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष विचलित करायचं आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचं आहे. यापेक्षा जास्त काही नाही,' असं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शिवसेना विरुद्ध कंगना; वाद पेटलाकंगना राणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर वाद पेटला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना  पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असं सरनाईक म्हणाले.

सरनाईक यांच्या विधानाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल; सरनाईक विधानावर ठामभाजपनं राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे, अशी रोखठोक भूमिका सरनाईक यांनी घेतली आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याचं दिसत आहे.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला उपरतीचहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर कंगनानं मुंबईबाबतच्या आपल्या भावना ट्विट करून व्यक्त केल्या. त्यात ती म्हणते की, महाराष्ट्रामधील माझ्या मित्रांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. त्यांना माझ्या बोलण्याचा रोख माहीत आहे. तसंच माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईवर असलेल्या माझ्या प्रेमाचा पुरावा देण्याचीही मला गरज वाटत नाही. मुंबईनं मला नेहमीच यशोदेप्रमाणे सांभाळलं आहे. कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेने केली पोलिसात तक्रारVIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारणकंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...'अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतNitesh Raneनीतेश राणे pratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत