Join us  

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 9:39 AM

Stock Market Open: शेअर बाजाराच्या कामकाजाला गुरुवारी तेजीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 66 अंकांच्या तेजीसह 74630 वर उघडला.

Stock Market Open: शेअर बाजाराच्या कामकाजाला गुरुवारी तेजीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 66 अंकांच्या तेजीसह 74630 वर तर निफ्टी 26 अंकांच्या तेजीसह 22631 वर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात गुरुवारी बीपीसीएल, हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, अदानी एंटरप्रायजेस आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये तेजी होती. 

तर कोटक बँक, हिंडाल्को, मारुती सुझुकी, डिव्हिस लॅब्स, भारती एअरटेल, विप्रो आणि इन्फोसिस च्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टीच्या क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचं झालं तर गुरुवारच्या सुरुवातीच्या कामकाजादरम्यान निफ्टी आयटी निर्देशांक किंचित घसरणीसह काम करत होता, तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांत वाढत दिसून आली. 

मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. तर महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी शेअर बाजार बंद होता. गुरुवारी शेअर बाजारात तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शेअर बाजाराचं कामकाज तेजीनं सुरू होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. प्री-ओपन सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 80 अंकांनी घसरून 74402 अंकांवर तर निफ्टी 37 अंकांनी घसरून 22568 अंकांवर कामकाज करत होता. 

फेडरल रिझर्व्हनं दर बदलले नाहीत 

गुरुवारी शेअर बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने महागाईच्या चिंतेमुळे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. विक्रमी जीएसटी महसूल, एफआयआय आणि डीआयआय खरेदी आणि कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८०डॉलरच्या खाली जाणं, हे भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक घटक आहेत.

टॅग्स :शेअर बाजार