VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 10:17 AM2020-09-05T10:17:25+5:302020-09-05T10:21:29+5:30

शिवसेना-कंगना राणौत वादात मनसेची एंट्री; वेगळंच राजकारण सुरू असल्याचा दावा

shiv sena purposely giving importance to kangana ranaut says mns leader sandeep deshpande | VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

Next

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर सातत्यानं बोलणाऱ्या, बॉलिवूडमधील अनेक प्रस्थापितांना लक्ष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतनं आता राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आणि कंगना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तर मुंबईत येणारच. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान कंगनानं दिलं आहे. शिवसेना विरुद्घ कंगना वादावर आता मनसेनं भाष्य केलं आहे.

अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...

शिवसेना आणि कंगना वादामागे वेगळेचं कारण असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी सांगितलं आहे. सध्या राज्यात विविध प्रश्न आहेत. लोकांचे हाल होत आहेत. त्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना नेते कंगनाला इतकं महत्त्व देत आहेत, असा दावा त्यांनी केला. 'सध्या मंदिरात प्रवेशाला बंदी आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोऱ्या वाजल्यानं हजारो लोकांचे बळी गेले आहेत. मुख्यमंत्री घरात बसल्यानं जनतेत नाराजी आहे. रेल्वेसेवा सुरू नसल्यानं लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत,' अशा शब्दांत देशपांडेंनी राज्यातील समस्यांची यादीच वाचून दाखवली.



मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळलं; विवादानंतर कंगनाला उपरती

राज्यातील समस्यांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी ज्या व्यक्तीची पाच पैशांची किंमत नाही, ज्या व्यक्तीच्या वक्तव्याला पाच पैशांची किंमत नाही, त्याला किंमत दिली जात आहे. ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी विधानं करत आहे. त्या व्यक्तीनं प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नक्कीच नाही. पण शिवसेना मुद्दाम जाळ्यात अडकतेय का हा प्रश्न आहे. इतर सगळ्या गोष्टींवरून लक्ष विचलित करून या एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत व्हायला हवं, हा शिवसेनेचा प्रयत्न आहे का, त्यासाठी काही षडयंत्र रचलं जात नाही ना, याचा विचार जनतेनं करायला हवा, असं देशपांडे म्हणाले.

अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शिवसेनेची मागणी  ​​​​​

गेल्या दोन महिन्यात एका इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्राचा संपादक शिवसेनेचे वाभाडे काढत होता. त्यावेळी गप्प राहिलेली शिवसेना आता का बोलतेय याचा विचार व्हायला हवा. या षडयंत्रात कोण कोण आहे याचाही विचार झाला पाहिजे. जनता सुज्ञ आहे. ती याचा विचार नक्की करेल, अशी आशा देशपांडेंनी व्यक्त केली. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना कंगनाच्या विधानांना महत्त्व देत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. या टीकेली शिवसेना काय उत्तर देते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

'जे भाजपाच्या पोटात ते कंगनाच्या मुखात, महाराष्ट्रद्रोह्यांना जनता माफ करणार नाही'

Web Title: shiv sena purposely giving importance to kangana ranaut says mns leader sandeep deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.