शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम' झालाय; नितेश राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 11:04 IST

Coronavirus : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात करण्यात आलेत शिथिल. १७ ऑगस्टपासून राज्यात भरणार पहिली ते सातवीचे वर्ग.

ठळक मुद्दे राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात करण्यात आलेत शिथिल. १७ ऑगस्टपासून राज्यात भरणार पहिली ते सातवीचे वर्ग.

कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी दुकानांची वेळही वाढवण्यात आली आहे. परंतु धार्मिक स्थळं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. मंदिरं उघडण्यास परवानगी नसल्यानं भाजपचे नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. 

"२ दिवसात लोकल चालू, १७ ऑगस्ट पासून शाळा चालू, मग २ डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही ? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का?, हिंदूंवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम' झाला आहे," असं म्हणत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला.  काही दिवसांपूर्वीच राज्यातील कमी होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर काही जिल्हे सोडून निर्बंध शिथिल करण्यात आले. ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. असं असलं तरी चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्स सुरू करण्यास परवानगी असली तरी मॉल्समधील मल्टीप्लेक्स बंद ठेवण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. तसंच राज्यातील सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहणार आहेत.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रSchoolशाळाVarsha Gaikwadवर्षा गायकवाडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTheatreनाटकlocalलोकलrailwayरेल्वे