भ्रमातून बाहेर या आणि जनतेकडे लक्ष द्या; भाजपचं नाना पटोलेंना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 08:59 PM2021-04-23T20:59:44+5:302021-04-23T21:02:55+5:30

नाना पटोले यांनी यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती टीका

bjp leader keshav upadhye slams nana patole over comment on chandrakant patil rahul gandhi | भ्रमातून बाहेर या आणि जनतेकडे लक्ष द्या; भाजपचं नाना पटोलेंना आवाहन

भ्रमातून बाहेर या आणि जनतेकडे लक्ष द्या; भाजपचं नाना पटोलेंना आवाहन

Next
ठळक मुद्देनाना पटोले यांनी यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती टीकापटोले यांनी आपल्या मतदारसंघात किती सेवाकार्य केले हे जाहीर केलं तर बरं होईल : भाजप

"भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कोणतीच टीका केलेली नसताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडणे दुर्देवी आहे. नाना पटोले यांनी भ्रमातून बाहेर यावे आणि आरोपप्रत्यारोपांचा खेळ खेळण्यापेक्षा राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून कोरोनाकाळात जनतेकडे लक्ष द्यावे," असे आवाहन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केले.

"भाजपा प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. प्रत्यक्षात चंद्रकांत पाटील यांनी अशी कोणतीही टीका केलेली नाही. गुरुवारी त्यांच्या नावे एक व्हॉट्सअॅप पोस्ट काही ग्रुपमध्ये फिरत होती. ती भाजपाने प्रसिद्ध केलेली अधिकृत प्रेसनोट नव्हती. पण पटोले यांनी मात्र तो मजकूर प्रमाण मानून भाजप प्रदेशाध्यक्षांवर टीका केल्याचं दिसत आहे," असं उपाध्ये म्हणाले. सध्याचे कोरोनाचे महाराष्ट्रातील संकट मती गुंग करणारे असले तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भ्रमात राहू नये. सत्ताधारी पक्षाचे नेतेच कल्पनेत जगत राहिले तर जनतेला मदत कोण करणार हा प्रश्न असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

"भाजप प्रदेशाध्यक्ष पुण्याचे सेवक आहेत की, पूनावालांचे असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. प्रदेशाध्यक्ष हे कोथरूडचे आमदार असल्याने त्या मतदारसंघाचे सेवक आहेत, कोथरूडचा समावेश असलेल्या पुण्याचे सेवक आहेत आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते संपूर्ण महाराष्ट्राचे सेवक आहेत. कोरोनाच्या संकटात त्यांच्या पुढाकाराने पुणे शहरात भाजपने पहिल्या लाटेत प्रभावी सेवाकार्य केले आणि आता दुसऱ्या लाटेतही नव्या जोमाने सेवाकार्य सुरू आहे. पूनावालांची उठाठेव करण्यापूर्वी नाना पटोले यांनी भाजपच्या पुण्यातील सेवाकार्याची दखल घेतली असती तर बरे झाले असते. पटोले यांनी आपल्या मतदारसंघात किती सेवाकार्य केले त्याची माहिती जाहीर केली आणखी चांगले होईल," असेही उपाध्ये म्हणाले.
 

Web Title: bjp leader keshav upadhye slams nana patole over comment on chandrakant patil rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.