... या निमित्तानं राहुल गांधींची कुवत आणि अक्कल जनतेला समजली; भाजप नेत्याचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 13:20 IST2021-02-15T13:13:23+5:302021-02-15T13:20:13+5:30
... तो निर्णय UPA सरकारच्या काळातला हेदेखील माहित नाही, असं म्हणत भाजप नेत्याचा राहुल गांधींवर हल्लाबोल

... या निमित्तानं राहुल गांधींची कुवत आणि अक्कल जनतेला समजली; भाजप नेत्याचा निशाणा
भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्य सरकारकडून २०१४ पासून गोदामे बांधण्यासाठी अंबानी आणि अदानींनी किती करार मिळवले याची माहिती मागून मोदी सरकारला पेचात पाडता येईल, हा राहुल गांधी यांनी केलेला विचार त्यांना पूर्ण निराश करून गेला. यावरील माहिती समोर आल्यानंतर आता भाजप नेते अतुल भातखलकर यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
"भारतीय अन्न महामंडळाच्या देशभरातील एकूण ९३ गोदामांपैकी केवळ ९ गोदामं बांधण्याचं कंत्राट अदानींना मिळालं. तर अंबानींना एकही नाही. ही वस्तुस्थिती समोर आली. यानिमित्ताने राहुल गांधींची कुवत आणि अक्कल पुन्हा जनतेला कळली. हा निर्णय UPA च्या कार्यकाळातला हेही त्यांना माहित नाही," असं म्हणत भातखळकर यांनी राहुल गांधींना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींवर हल्लाबोल केला.
भारतीय अन्न महामंडळाच्या देशभरातील एकूण ९३ गोदामांपैकी केवळ ९ गोदामे बांधण्याचे कंत्राट अदानींना मिळाले तर अंबानींना एकही नाही ही वस्तुस्थिती समोर आली. यानिमित्ताने राहुल गांधींची कुवत आणि अक्कल पुन्हा जनतेला कळली. हा निर्णय UPA च्या कार्यकाळातला हेही त्यांना माहीत नाही. pic.twitter.com/5UWrkqerel
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2021
काय आहे विषय?
ग्राहक कामकाज आणि अन्नमंत्री पीयूष गोयल यांनी गांधी यांना लोकसभेत १४ पानी लेखी उत्तर दिलं. त्यात धान्य साठवण्याची क्षमता वाढवणारी गुदामे बांधण्याची कंत्राटं खासगी क्षेत्राला दिल्याचा प्रत्येक तपशील होता. सभागृहात ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यावर हे स्पष्ट झाले की, अंबानी यांनी एकही कंत्राट मिळवलेले नाही. तथापि, अदानींनी संपूर्ण भारतात ९३ पैकी नऊ कंत्राटं मिळवली.
कंत्राटांचा विचारला तपशील
पीईजी योजना गोदामांची साठवणूक क्षमता अत्याधुनिक करण्यासाठी २००८ मध्ये मनमोहन सिंग सरकारने सुरू केली होती. राहुल गांधी यांनी पीयूष गोयल यांना कंत्राटांचा तपशील विचारला तो २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचा. पीईजी योजनेखाली खासगी कंपनीला कोणत्याही दोन मॉडेल्सपैकी एकाची निवड करता येते. १) बांधा, वापरा आणि मालक व्हा (बीओओ) आणि २) बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी). एफसीआय आणि राज्ये ही गोदामे खासगी मालकीची असतील तर भाड्याने घेतात.