शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

Anil Deshmukh: “अनिल देशमुखांना ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवायला लागलं”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 3:05 PM

Anil Deshmukh: ईडीने पाठवलेल्या नोटिसीवर अनिल देशमुख यांनी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली असून, यावर आता भाजपकडून टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअनिल देशमुखांवर भाजपची टीकाईडी कार्यालयात प्रत्यक्ष हजर न राहण्याबाबत लगावला टोलाभाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून साधला निशाणा

मुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यामागे असलेल्या ईडीचा ससेमिरा अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. ईडीने पाठवलेल्या नोटिसीवर अनिल देशमुख यांनी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली असून, यावर आता भाजपकडून टीका करण्यात आली आहे. (bjp keshav upadhye criticised anil deshmukh over ed notice)

सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यासाठी अनिल देशमुखांना नोटीस बजावण्यात आली होती. मंगळवार, २९ जून रोजी प्रत्यक्ष चौकशीसाठी अनिल देशमुख यांना उपस्थित राहण्यास ईडीकडून सांगण्यात आले होते. मात्र, वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. 

गडकरींची मोठी योजना! ‘फ्लेक्स’ इंजिन तीन महिन्यांत; इंधनात ३० ते ३५ रुपयांची बचत होणार?

तेव्हा वज, आजारपण आठवलं नाही

कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबई नागपूर विशेष विमान फेऱ्या सुरू होत्या तेव्हा वय, आजारपण हे अनिल देशमुख यांना आठवत नव्हतं आता मुंबईतून ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवयाला लागले, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. 

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची तयारी

प्रत्यक्ष चौकशीऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. अनिल देशमुख यांच्या या भूमिकेनंतर ईडीने पुन्हा त्यांना निरोप धाडला आहे. चौकशीसाठी कार्यालयात २४ तासांत हजर राहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करणार, असे ईडीने अनिल देशमुख यांना म्हटले आहे.

दरात मोठी घसरण! हॉलमार्किंग सोन्याचा भाव ४६ हजारांवर; चांदीही झाली स्वस्त 

दरम्यान, ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझे वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपाPoliticsराजकारण