भाजपाने काँग्रेसला पुन्हा दिला धक्का, पाच आमदारांनी हाती घेतले कमळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:25 PM2020-08-19T20:25:49+5:302020-08-19T20:35:04+5:30

राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यात अपयश आले असले तरी मणिपूरमध्ये काँग्रेसला सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले आहे.  

BJP gave another blow to Congress, five Congress MLAs join BJP in Manipur | भाजपाने काँग्रेसला पुन्हा दिला धक्का, पाच आमदारांनी हाती घेतले कमळ

भाजपाने काँग्रेसला पुन्हा दिला धक्का, पाच आमदारांनी हाती घेतले कमळ

Next
ठळक मुद्दे मणिपूरमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील सरकार अस्थिर करण्याची काँग्रेसची खेळी भाजपाने काँग्रेसवरच उलटवलीकाँग्रेसच्या मणिपूरमधील पाच आमदारांनी आज भाजपामध्ये केला प्रवेश बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाने बजावलेला व्हिप धुडकावून लावत विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनाला दांडी मारली होती

नवी दिल्ली - सत्तेच्या डावपेचात भाजपानेकाँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यात अपयश आले असले तरी मणिपूरमध्ये काँग्रेसला सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले आहे.  मणिपूरमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील सरकार अस्थिर करण्याची काँग्रेसची खेळी भाजपाने काँग्रेसवरच उलटवली असून, काँग्रेसच्या मणिपूरमधील पाच आमदारांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.

भाजपाच्या काही आमदारांनी दिलेले राजीनामे आणि मित्रपक्षाच्या आमदारांची नाराजी यामुळे मणिपूरमधील एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर झाले होते. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाने बजावलेला व्हिप धुडकावून लावत विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनाला दांडी मारली होती. त्यामुळे बिरेन सिंह सरकारला बहुमत मिळवणे सोपे गेले होते. दरम्यान, या सहा आमदारांनी काँग्रेससोबत विधानसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.



मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह सोमवारी या सर्व बंडखोर आमदारांना घेऊन दिल्लीत आले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर बिरेन सिंह यांनी ट्विट करून या भेटीबाबत माहिती दिली. तसेच विश्वास ठराव जिंकल्याबद्दल नड्डा यांनी सरकारचे अभिनंदन केले, अशी माहितीही त्यांनी दिली.

मणिपूरमधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकाराने विश्वासमत ठराव १६ विरुद्ध २८ मतांनी जिंकला होता. सभागृहातील आघाडी सरकारकडे विधानसभा अध्यक्षांसह २९ सदस्यांचे पाठबळ होते. तर विरोधी काँग्रेसकडे २४ आमदार होते. मात्र या आमदारांपैकी ८ जणांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला नाही. या विश्वास ठरावात भाजपा सरकारचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र काँग्रेसचे आठ आमदार अनुपस्थित राहिल्याने भाजपाचा मार्ग अधिकच सोपा झाला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: BJP gave another blow to Congress, five Congress MLAs join BJP in Manipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.