Bihar Election 2020 : 'हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा', मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 10:49 AM2020-10-25T10:49:30+5:302020-10-25T11:34:44+5:30

Bihar Election 2020 And Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाषणादरम्यान संयम सुटला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Bihar Election 2020 video why did nitish kumar says ask your father ask your mother | Bihar Election 2020 : 'हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा', मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला; म्हणाले...

Bihar Election 2020 : 'हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा', मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला; म्हणाले...

Next

नवी दिल्ली - बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections 2020) प्रचारात भाजपा उमेदवारांच्या सभांना फारशी गर्दी होत नाहीय. तर दुसरीकडे लालूंच्या पक्षाच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. याच दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाषणादरम्यान संयम सुटला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"तुम्हाला संधी होती, तेव्हा एखादे शाळा-महाविद्यालय उभारले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा" असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. बेगुसरायमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी शनिवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीश यांनी असं म्हटलं आहे. "इतरांना सरकार बनविण्याची संधी मिळाली. त्यांनी काय केले? एखादे शाळा-महाविद्यालय बांधले का? आज तुम्हाला शिकायचे आहे, तर सरकार असताना शाळा-महाविद्यालय बांधले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा" असं म्हटलं आहे.

नितीश कुमार यांनी "शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर भर देण्याऐवजी 'जंगलराज'वर भर देणाऱ्यांनी नोकरी व विकासावर बोलणे म्हणजे थट्टाच आहे. तुरुंगात जावे लागल्यावर खुर्चीवर पत्नीला आणून बसवले. आपल्या बिहारमध्ये हे होत होते. परंतु, आता माझ्या सरकारमध्ये एखादे चुकीचे कृत्य केले, कायदा मोडला, तर त्याला थेट तुरुंगात जावे लागते" असं देखील म्हटलं आहे. अशातच ABP CVoter ने ओपिनिअन पोलचा पहिला सर्व्हे जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यात इंडिया टुडेने ओपिनिअन पोल दिला होता.

बिहारचा दुसरा ओपिनिअन पोल आला; नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्यात स्पर्धा रंगणार

या ओपिनिअन पोलनुसार बिहारच्या सीमांचलमधील 24 जागांवर नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए बाजी मारताना दिसत आहे. एनडीएच्या खात्यात 11 ते 15 जागा जाण्याची शक्यता आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीला 8 ते 11 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे एनडीएतून बाहेर पडत निवडणूक लढवत असलेला पक्ष लोक जनशक्तिच्या पारड्यात भोपळा पडण्याची शक्यता आहे. तर अपक्ष व इतरांना 1-1 जागा जाण्याचा अंदाज आहे. सीमांचल भागातील मतदारांनी 28 टक्के मते एनडीएला, महाआघाडीला 46 टक्के मते आणि पासवान यांना 4 टक्के व इतरांना 22 टक्के मतदान करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

28 ऑक्टोबरला 71 विधानसभा जागांवर निवडणूक

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला 71 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. यामध्ये कहलगांव, सुल्तानगंज, अमरपुर, धौरैया, बांका, कटोरिया, बेलहर, तारापुर, मुंगेर, जमालपुर, सूर्यगढ़ा, लखीसराय, शेखपुरा, बरबीघा, मोकमा, बाढ़, मसौढ़ी, पालीगंज, बिक्रम, संदेश, बड़हरा, आरा, अगिआँव, तरारी, जगदीशपुर, शाहपुर, ब्रहमपुर, बक्सर, डुमरांव, राजपुर, रामगढ़, मोहनियां, भभुआ, चैनपुर, चेनारी, सासाराम, करगहर, दिनारा, नोखा, डिहरी, काराकट, अरवल, कुर्था, जहानाबाद, घोसी, मखदुमपुर, गोह, ओबरा, नवीनगर, कुटुम्बा, औरंगाबाद, रफीगंज, गुरूआ, शेरघाटी, इमामगंज, बाराचट्टी, बोध गया, गया टाउन, टिकारी, बेलागंज, अतरी, वजीरगंज, रजौली हिसुआ, नवादा, गोबिंदपुर, वारसलीगंज, सिकंदरा, जमुई, झाझा आणि चकाई अशा जागा आहेत. 

Web Title: Bihar Election 2020 video why did nitish kumar says ask your father ask your mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.