शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'नरेंद्र मोदी, नितीश कुमार आले की पकोडे खायला घाला', राहुल गांधींचा निशाणा

By ravalnath.patil | Updated: October 28, 2020 15:57 IST

bihar elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

ठळक मुद्देराहुल गांधी यांनी रोजगारापासून ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

चंपारण : बिहार विधानसभा निवडणुसाठी आज पहिल्या टप्पात मतदान होत आहे. यातच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकींसाठी प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, स्टार प्रचारक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी पश्चिम चंपारणमध्ये मोर्चा काढून महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राहुल गांधींनी निशाणा साधला.

एनडीएच्या नेत्यांवर खोटे बोलण्याचा आरोप करत आमच्यात अशी एक कमी आहे की, आम्ही खोटे बोलून त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी रॅलीत स्टेजच्या समोर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पकोडे तळण्याविषयी त्यांना आठवण करून दिली. यावर राहुल गांधी यांनी आपले भाषण थांबवले आणि तुम्ही पकोडे बनविले आहेत का? असा सवाल त्या व्यक्तीला केला. तसेच, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार पुढील वेळी आले की त्यांना पकोडे खायला घाला, असे राहुल गांधींनी सांगितले.

याआधी राहुल गांधी यांनी रोजगारापासून ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, लॉकडाऊन दरम्यान कामगारांच्या परिस्थितीवरूनही सरकारला घेरले. नरेंद्र मोदींनी कामगारांना पायी चालवले आहे, राहुल गांधी म्हणाले. तसेच, कृषी कायद्याला शेतकऱ्यांच्या विरोधाचा संदर्भ देताना राहुल गांधी म्हणाले की, पंजाबमध्ये दसर्‍यानिमित्त रावणाच्या जागी पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्यात आला आहे. हे पाहून मला वाईट वाटले, कारण पंतप्रधानांचा पुतळा असा जाळू नये. मात्र, शेतकऱ्यांनी दु: खी असल्यामुळे असे केले." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार