शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

.... आणि अशाप्रकारे अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या केले अमोल कोल्हेंच्या शिरुर उमेदवारीवर शिक्कामोर्तब 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 3:59 PM

ज्यांना तुम्ही टिव्हीत पाहता त्यांना फक्त पाहू नका तर, त्यांच्या नांवा समोरील बटन दाबा...

शिरूर:  तुम्हाला हवा, तोच उमेदवार आम्ही देणार आहोत. शिरूर लोकसभेच्या उमेदवारोबाबत जनतेची पसंती शरद पवारांना कळवली जाईल व साहेबच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतील. मात्र, त्यानंतर पवार यांनी ज्यांना तुम्ही टिव्हीत पाहता त्यांना फक्त पाहू नका तर, त्यांच्या नावासमोरील बटन दाबा असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली.       न्हावरे ( ता . शिरूर ) येथे राष्ट्रवादीतर्फ आयोजित संवादयात्रा कार्यक्रमात पवार बोलत होते.त्यांनी आपल्या तासाभराच्या भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. पवार यांनी भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात शिरूर लोकसभेसाठी आमदार विलास लांडे,माजी आमदार पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे,देवदत्त निकम आदी उमेदवार इच्छुक आहे. आता तुम्हाला जो उमेदवार पसंद आहे त्याचे नाव घेतल्यावर हात वर करा असे आवाहन केले.पवारांनी सगळ्यांची नांवे घेतली. पण एकही हात वर येईना.विलास लांडे यांचे नाव घेतल्यावर ठराविकच लोकांनी हात वर केले. पवार यांनी सर्वात शेवटी अमोल कोल्हे यांचे नांव घेतले. आणि उपस्थितांपैकी सर्वांनीच जल्लोषात हात वर केले. यावर पवार म्हणाले, तुम्हाला हवा, म्हणजेच जनतेला हवा तोच उमेदवार आम्ही देणार आहोत. शिरूर लोकसभेच्या उमेदवारोबाबत जनतेची पसंती शरद पवारांना कळवली जाईल व ते निर्णय घेतील. यानंतर मात्र पवार यांनी ज्यांना तुम्ही टिव्हीत पाहता त्यांना फक्त पाहू नका तर, त्यांच्या नांवा समोरील बटन दाबा असे सांगून अप्रत्यक्षरित्वा कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली.यामुळे उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या लांडे यांचा माग हिरमोड झाला.           मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली असे सांगताना पवार यांनी, सध्या जी युध्दजन्य परिस्थिती  निर्माण झाली आहे, तिथे शंकेची सुई फिरत असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले,अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेन, भारतात लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही तरी घडेल असे सांगितले होते, राज ठाकरेही अशी परिस्थिती निर्माण केली जाईल म्हणाले होते.यामुळे सध्या घडलेल्या घटना शंकास्पद असल्याचा आरोप पवार यांनी केला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार विलास लांडे अतुल बेनके, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार, पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .

टॅग्स :ShirurशिरुरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस