पिंपरी : अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. देहूरोड येथे मंगळवारी (दि. २८ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. रमेश रेड्डी (रा. देहूरोड) असे खून झालेल्याचे नाव आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश रेड्डी हा एका हॉटेल जवळ असताना अज्ञातांनी गोळीबार केला. यात रमेश गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रमेश ला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मागील वर्षी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रमेश याचा भाऊ विक्रम गुरूस्वामी रेड्डी (३७, रा. गांधीनगर, देहूरोड) याचा देखील गोळ्या घालून खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच यातील संशयीतांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
Web Summary : A young man, Ramesh Reddy, was shot dead by unknown assailants in Dehuroad. Police are investigating the incident, which occurred near a hotel. The victim's brother was also murdered in a similar fashion last year, heightening tensions in the area.
Web Summary : देहूरोड में अज्ञात हमलावरों ने रमेश रेड्डी नामक एक युवक की गोली मारकर हत्या कर दी। पुलिस मामले की जांच कर रही है। घटना एक होटल के पास हुई। मृतक का भाई भी पिछले साल इसी तरह मारा गया था, जिससे इलाके में तनाव बढ़ गया है।