Youth beating up by gangs for not paying money for expenses | खर्चासाठी पैसे न दिल्याने तरूणाला टोळक्याची बेदम मारहाण
खर्चासाठी पैसे न दिल्याने तरूणाला टोळक्याची बेदम मारहाण

पिंपरी : खर्चासाठी पैसे न दिल्याने सहा जणाच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने, कोयत्याने तरूणाला बेदम मारहाण केली. त्याच्या खिशातील साडेतीन हजार जबरदस्तीने लुटून नेले. ही घटना चिखलीतील टॉवर लाईन येथे घडली.
चिखलीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन रामभाऊ मांडले (वय २०, रा. टॉवर लाईन, चिखली) याने  फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कुणाल, संदेश उर्पष्ठ संजय जाधव, प्रविण सुकळे, अनिल वाकुडे, विजय घाटे, अशिषकुमार वरकडे (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चेतनकडे आरोपींनी खर्च करण्यासाठी पैसे मागितले. चेतनने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याला ओढत आरोपी अशिषकुमार वरकडे याच्या खोलीत नेले. तेथे लाकडी दांडक्याने, कोयत्याने चेतनला बेदम मारहाण केली. चेतनच्या खिशातील साडेतीन हजार रुपए जबरदस्तीने काढून घेतले. तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Youth beating up by gangs for not paying money for expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.