इंस्टाग्रामवरील ओळखीतून तरुणाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 18:32 IST2022-08-25T18:32:18+5:302022-08-25T18:32:33+5:30
लैंगिक अत्याचार करून इन्स्टाग्राम व व्हाटसॲपवरून संभाषण करून बदनामी केली

इंस्टाग्रामवरील ओळखीतून तरुणाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार
पिंपरी : इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून तरुणाने महिलेला लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर लैंगिक अत्याचार करून इन्स्टाग्राम व व्हाटसॲपवरून संभाषण करून बदनामी केली. रुपीनगर तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या लाॅजवर ९ मे २०२१ ते २३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. २४) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश रोहिदास गोरे (वय २४, रा. परळी वैजनाथ, बीड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांची इंस्टाग्राम या ॲपवरून ओळख झाली होती. आरोपी याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच रुपीनगर येथील तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या लाॅजवर फिर्यादी महिलेला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी महिलेसोबत मोबाईल फोनवर व इंस्टाग्रमा व व्हाटसॲपवरून संभाषणकरून बदनामी करतो, असे आरोपी म्हणाला, असे फिर्यादीत नमूद आहे.