‘मला पार्टीला का बोलावले नाही’, वाढदिवसाचा केक कापताना मित्रावर कोयत्याने वार

By प्रकाश गायकर | Updated: June 21, 2024 15:53 IST2024-06-21T15:51:26+5:302024-06-21T15:53:55+5:30

वाढदिवसाला न बोलविल्याच्या कारणावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार करून चार वाहनांची तोडफोडही केली

Why wasn't I invited to the party stabbed friend while cutting birthday cake in pimpri | ‘मला पार्टीला का बोलावले नाही’, वाढदिवसाचा केक कापताना मित्रावर कोयत्याने वार

‘मला पार्टीला का बोलावले नाही’, वाढदिवसाचा केक कापताना मित्रावर कोयत्याने वार

पिंपरी : मित्रांनी मित्राच्या वाढदिवसाला न बोलविल्याच्या कारणावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केले. तसेच चार वाहनांची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि. २०) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ममतानगर, जुनी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी मयूर सुरेश गायकवाड (३०, रा. ममतानगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिकेत गायकवाड (वय २३, रा. औंध, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड त्यांचे मित्र अतुल पोंगडे यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ मित्र ओम मोरे यांच्या वाढदिवसाचा केक कापत होते. त्यावेळी संशयित आरोपी अनिकेत तिथे आला. त्याने मित्रांना शिवीगाळ करत ‘मला पार्टीला का बोलावले नाही’ असे म्हणत मित्राची दुचाकी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यास गायकवाड यांनी अडवले. त्यानंतर अनिकेत याने फिर्यादी गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्याकडे असलेला कोयता हवेत फिरवून फिर्यादीवर वार केले. त्यानंतर आरोपी अनिकेत याने सुमित सोनवणे यांची दुचाकी फोडली. ममतानगर, गल्ली क्रमांक चार येथून जात असताना त्याने आणखी दोन चार चाकी आणि एक दुचाकी वाहनाची तोडफोड केली.

Web Title: Why wasn't I invited to the party stabbed friend while cutting birthday cake in pimpri