शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चर्चा तर होणार ना भाऊ.. जेव्हा मुख्यमंत्र्याच्या सौभाग्यवती बैलगाडी चालवितात.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 13:14 IST

फुलांनी सजवलेल्या, शिंगाना गुलाबी रंगांचे गोंडे बांधलेल्या, ऐटदार खिल्लारी जोडी असलेल्या बैलगाडा चालविण्याचा आनंद लुटला.

पिंपरी : आपण त्यांना याअगोदर गाणे गाताना पाहिले, कधी त्यांची क्रुझवरील सेल्फीची क्लिक अनुभवली.. तर कधी त्यांच्या सामाजिक कामाचे दर्शनही झाले असेल पण त्यांना फुलांनी सजवलेल्या, शिंगाना गुलाबी रंगांचे गोंडे बांधलेल्या, ऐटदार खिल्लारी बैलांची जोडी असलेल्या बैलगाडी चालविताना पाहणे हा दुर्मिळ योगा योगच... खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी जेव्हा बैलगाडा चालविण्यास सुरुवात केली तेव्हा उपस्थितांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या...भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर शिवांजली महिला बचत गटाच्या वतीने भोसरीतील गायजत्रा मैदानावर इंद्रायणी थडी जत्रेस फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी संयोजक आमदार महेश लांडगे, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, पूजा लांडगे आदी उपस्थित होते. फुलांनी सजवलेल्या, शिंगाना गुलाबी रंगांचे गोंडे बांधलेल्या, ऐटदार खिल्लारी जोडी असलेल्या बैलगाडीतून, ढोल ताशांच्या गजरात अमृता फडणवीस यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. त्यांनी बैलगाडा चालविण्याचा आनंद लुटला. केशरी रंगाचा हिरवा तुरा असलेला फेटा फडणवीस यांना बांधला होता.ग्रामीण संस्कृतीचा अनुभव त्यांनी घेतला.यावेळी खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरच्या बास्केटबॉलच्या राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा ५१००० रुपयांचा धनादेश देऊन खास सत्कार करण्यात आला. तसेच किल्ले चढण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गिरीजा धनाजी लांडगे हिचा अमृता फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 

फडणवीस म्हणाल्या, आपल्या महिला बचतगटांमधील स्त्रिया प्रामाणिकपणे जे काम करतात त्याला तोड नाही. त्यात त्यांची जिद्द दिसून येते. नाहीतर आजकाल मोठ्या मोठ्या कंपन्यादेखील बँकांकडून कर्ज घेऊन ती बुडवतात. पण महिला बचतगटांतील महिला त्यांच्या कर्जाची  प्रामाणिकपणे परतफेड करतात. आपल्या आर्थिक बाबींमध्ये स्त्रियांचा जास्त हातभार असेल तर देश पुन्हा एकदा नक्कीच सोने की चिडीया बनू शकेल. फडणवीस म्हणाल्या, जत्रेमुळे महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळणार आहे. आपण आता मोठा विचार करायला हवा. चांगले कौशल्य आत्मसात केले तर त्याला नक्कीच चांगली बाजारपेठ मिळेल. तुमच्या मनात प्रबळ इच्छा असेल तर यशाचे शिखर नक्की गाठता येईल. स्त्री ही अबला नसून सबला आहे. हिरकणीसारखी साधी स्त्री आपल्या बाळासाठी कोणत्याही अग्निदिव्याला सामोरी गेली. स्त्रिया प्रत्येक संकटाला धैयार्ने तोंड देतात. प्रास्तविक सोनाली गव्हाणे यांनी केले. आभार आमदार महेश लांडगे यांनी मानले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेAmruta Fadnavisअमृता फडणवीसBull Cart Raceबैलगाडी शर्यत