पिंपरी : कासारसाई धरणावरून घरी परतत असलेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव वेगातील मिक्सरने धडक दिली. या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला असून तरुणही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी मारुंजीतील शिंदेवस्ती येथे घडली.
हिंजवडीपोलिसानी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिदा इमरान खान (१९, रा. विमाननगर, पुणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर, विवेक ठाकूर हा तरुण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिदा आणि विवेक हे कासारसाई धरण भागात गेले होते. दरम्यान, दुपारी दुचाकीवरून माघारी येत असता मारुंजीतील शिंदेवस्ती येथे मिक्सरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रिदा हिचा जागीच मृत्यू झाला, तर विवेक ठाकूर हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मिक्सर चालक अजमल अख्तर अन्सारी (३२, रा. जांबे) याला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Web Summary : Near Kasarsai dam, a mixer truck hit a scooter, killing Rida Khan, 19, and seriously injuring Vivek Thakur. The accident occurred in Marunji. Police arrested the mixer driver; investigation ongoing.
Web Summary : कासारसाई बांध के पास एक मिक्सर ट्रक ने स्कूटर को टक्कर मार दी, जिससे 19 वर्षीय रिदा खान की मौत हो गई और विवेक ठाकुर गंभीर रूप से घायल हो गए। दुर्घटना मारुंजी में हुई। पुलिस ने मिक्सर चालक को गिरफ्तार कर लिया; जांच जारी है।