शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मनसे इंजिनला हवाय शहराध्यक्ष

By admin | Updated: July 13, 2015 04:07 IST

शहरातील सर्वच प्रमुख पक्षांनी शहराध्यक्ष आणि कार्यकारिणीत बदल करीत पक्षात नवी उभारी निर्माण केली आहे. बदलामुळे पक्षातील कार्यकर्ते

पिंपरी : शहरातील सर्वच प्रमुख पक्षांनी शहराध्यक्ष आणि कार्यकारिणीत बदल करीत पक्षात नवी उभारी निर्माण केली आहे. बदलामुळे पक्षातील कार्यकर्ते नव्या दमाने कामास लागले आहेत. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्व करण्याची संधी अद्याप कोणालाच दिली गेली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. प्रत्येक जण मनमानी पद्धतीने कार्य करीत असल्याने एकसंधपणा राहिलेला नाही. सत्तारूढ राष्ट्रवादी कॉँग्रेसने शहराध्यक्ष बदल केल्याने पक्षात जोश संचारला आहे. शिवसेनेने शहरप्रमुख नियुक्त करीत युवा नेतृत्वावर जबाबदारी दिली आहे. भाजपाचे कामकाज शहरात वेगात सुरू आहे. मरगळ आलेल्या कॉँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलल्यानंतर अंतर्गत वाद उफाळून आले. अशी परिस्थिती असतानाही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने व कार्यक्रम राबविले जात आहेत. भारतीय रिपब्लिकन पार्टी (आठवले) गटाच्या शहराध्यक्ष पदावरून वाद असले, तरी मोर्चे व आंदोलने कायम आहेत. मात्र, शहर मनसेमध्ये उलट स्थिती आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शहराध्यक्ष बदलण्यात येणार असल्याचे संकेत वरिष्ठांनी दिले होते. फेबु्रवारी महिन्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यामुळे शहराध्यक्ष निवड होईल, अशी आशा बळावली होती. शहराध्यक्षांच्या शर्तीमध्ये असलेले पदाधिकारी ठाकरे यांना मुंबईत जाऊन भेटून आल्यानंतर शहराध्यक्षाची घोषणा होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ती अपेक्षाही फोल ठरली. शहरात पक्षनेतृत्व, तसेच ठोस कार्यक्रम नसल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिशाहीन झाले आहेत. अस्तिवात असलेले काही गट आपल्या पद्धतीने कार्य करीत आहेत. छोटे- छोटे कार्यक्रम घेत आपणच पक्षाचे अधिकृत नेते असल्याचे भासविले जात आहे. इतर पक्षांशी सोयीस्करपणे जुळवून घेत कार्यक्रम राबविले जात आहेत. तर, आपण शहराध्यक्षपदावर कायम असल्याचा दावा मनोज साळुंके करत आहेत. कोणाचा अकुंश नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षांचा मार्ग स्वीकारला आहे. (प्रतिनिधी)