शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

Vaishnavi Hagawane Death Case : 'पुणे ते नेपाळ..' नीलेश चव्हाण पोलिसांना कसा सापडला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 07:44 IST

- वैष्णवीचे बाळ नीलेशकडे २ दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती.

पिंपरी :वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी फरार नीलेश चव्हाण याला शुक्रवारी पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना दहा दिवसांनी यश आले. नेपाळ सीमेवरून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. वैष्णवीच्या मुलाची हेळसांड करणे, चुलत्यांसह इतरांना धमकावणे याप्रकरणी चव्हाणवर गुन्हा दाखल होता.वाकड येथील वैष्णवी कस्पटे-हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अनेक खुलासे होण्यास सुरुवात झाली. वैष्णवीचे बाळ नीलेशकडे २ दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती.वाकड येथील वैष्णवी कस्पटे-हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अनेक खुलासे होण्यास सुरुवात झाली. वैष्णवीचे बाळ नीलेशकडे २ दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती. यानंतर चव्हाण याच्यावर दिनांक २१ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. अटक होण्याआधीच फरार झाला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली सुरू केल्या.देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लूक आउट नोटीस जारी केली. त्यानंतर पोलिसांनी चव्हाणची संपत्ती जप्त करण्यासाठी गुरुवारी नोटीस जारी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात सापडला. नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे. चव्हाण याला आता पुण्यात आणले जाणार आहे.आठ पथके मागावर होतीचव्हाणच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथकांची स्थापना केली होती. अँटी गुंडा स्क्वॉड आणि पुणे क्राइम ब्रँच संयुक्तपणे कारवाई करीत होती. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला. यामध्ये पुणे, मुंबई, कोकण, तसेच कर्नाटक आणि गोवा भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक व संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू केली होती. त्यानंतर दहा दिवसांनी अटक केली आहे.पुणे ते नेपाळ नीलेश चव्हाण  पोलिसांना कसा सापडलाआत्महत्या प्रकरणात पोलिसांनी हगवणे कुटुंबातील सर्वच आरोपींना अटक केली असून, सध्या ते पोलिस व न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील एक आरोपी चव्हाण हाही पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. पुणे, मुंबई, कर्जत, रायगड असा प्रवास केला, रायगडनंतर नीलेश दि. २१ मे रोजी महाराष्ट्राबाहेर पडला. दि. २५ मे रोजी खासगी ट्रॅव्हल्सने उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून दिल्लीला गेला. ज्या बसने तो प्रवास करत होता, त्या वातानुकूलित बसमधील प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यात नीलेश दिसून आला. स्लीपर सीटवरून उतरत असताना, हाती पाण्याची बाटली घेतलेला नीलेश चव्हाण बिनधास्तपणे फिरताना पाहायला मिळाला. त्याने त्यानंतर सोनोली (उत्तर प्रदेश), भैरवा (नेपाळ) आणि काठमांडू येथे पोहोचला. नेपाळमधून भैरवामार्गे सोनोलीमध्ये आल्यावर नीलेशला अटक केली. पाच दिवस तो नेपाळमध्येच मुक्कामी होता, असे पोलिसांचे मत आहे.बाळाचा कायदेशीर ताबा आजीकडेवैष्णवीच्या मृत्यूपश्चात २ महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बालकल्याण समितीने त्याच्या आजी व वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बालसंरक्षण समितीने जनकचा कायदेशीर ताबा आणि बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी आजी स्वाती कस्पटे यांची असेल, असे समितीने म्हटले आहे.

नीलेश गुन्हा दाखल केल्यापासून पोलिसांच्या हातावर तुरी देत फिरत होता. सुरुवातीला तो पुण्यातून रायगड येथे गेला. तेथून तो दिल्लीला गेला. दिल्ली, गोरखपूर, मार्गे सौनौली, भैरावाह मार्गे नेपाळचे काठमांडू असा प्रवास करीत गेला. त्यानंतर तो भैरावाह येथून उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सौनौलीला आला. त्याची माहिती मागावर असलेल्या पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. नीलेशकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे स्पष्ट होणार आहे. - विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्तउत्तर प्रदेशातील महाराजगंज येथून नीलेश चव्हाणला ताब्यात घेतले. त्याला गोरखपूर येथून विमानाने पुण्यात आणले जाईल. - संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखानीलेश नेपाळ- भारत सीमेवरून सहा ते सात कि.मी. वर असल्याची माहिती मिळाली. सायबर पोलिसांच्या मदतीने पोलिस तिथपर्यंत पोहोचले. तो नेपाळमधील सिम कार्डद्वारे तिथले इंटरनेट वापरत असे. तो एकटाच राहत होता.  -  अरविंद पवार, गुन्हे शाखा युनिट चारचे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेCrime Newsगुन्हेगारी