शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये २ लाखांची विनापरवाना विदेशी दारू जप्त; तीन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:20 IST

४०० बाटल्या व तीन मोबाइल फोन, असा एकूण २ लाख ४८० रुपये किमतीची विदेशी दारू व तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले

पिंपरी: गुन्हे शाखा युनिटने दोन लाख रुपये किमतीची विनापरवाना विदेशी दारू जप्त केली आहे आणि तीन जणांना अटक केली आहे. रामप्रसाद साहेबराव साळुंखे (वय ३३ वर्षे), तिलक हेमंत पटेल (वय २१ वर्षे, रा. वापी नानी तंबाडी, ता. पार्डी, जि. वलसाड, गुजरात) आणि अनिल रामसुरत यादव (वय २४ वर्षे, रा. गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंदे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष कसबे, सुनील जावळे, पोलिस अंमलदार सोमनाथ बोर्हाडे, सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, शशिकांत नांगरे, समीर काळे, निखिल फापाळे व राजकुमार इधारे असे पथक तयार करून दिघी पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी बोर्हाडे यांना खबर मिळाली. दाभाडे सरकार चौकजवळील तापकीर यांच्या मालकीच्या शेतात एका शेडमध्ये रामप्रसाद साळुंखे व त्याचे दोन साथीदार विदेशी दारू विक्रीसाठी सज्ज होते. त्यानंतर गुन्हे शाखा युनिटने दाभाडे सरकार चौकजवळील तापकीर यांच्या शेतात, चहोली येथे सापळा लावून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पकडले.

रामप्रसाद साळुंखे, तिलक पटेल आणि अनिल यादव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एकूण २० नग खाकी रंगाच्या बॉक्सची व दोन पांढऱ्या रंगाच्या गोणीत बाटल्या आढळून आल्या. ४०० बाटल्या व तीन मोबाइल फोन, असा एकूण २ लाख ४८० रुपये किमतीची विदेशी दारू व तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले. दिघी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Chinchwad: Illicit Foreign Liquor Worth ₹2 Lakh Seized, Three Arrested

Web Summary : Police seized ₹2 lakh worth of illegal foreign liquor in Pimpri Chinchwad, arresting three individuals. The raid, conducted near Dabhade Sarkar Chowk, uncovered 400 bottles and three mobile phones. A case has been registered at Dighi Police Station.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMONEYपैसा