मळवली रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीच्या धडकेत दोन जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 16:33 IST2019-07-06T16:32:15+5:302019-07-06T16:33:08+5:30
मळवली रेल्वे स्थानकासमोरील रेल्वे फाटक ओलांडताना पुणे-इंदौर एक्सप्रेस गाडीची धडक बसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यु झाला.

मळवली रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीच्या धडकेत दोन जण ठार
लोणावळा : मळवली रेल्वे स्थानकासमोरील रेल्वे फाटक ओलांडताना पुणे- इंदौर एक्सप्रेस गाडीची धडक बसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यु झाला. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.सतिश शिवराम हुलावळे (वय 32, रा. कार्ला, ता. मावळ) व महेंद्र जसाराम चौधरी (वय13, रा. मळवली, ता. मावळ) या दोघांचा या अपघातात मृत्यु झाला. मळवली रेल्वे स्थानकावर मालगाडी थांबली होती. सदर मालगाडीच्या आडून रेल्वे मार्ग ओलांडत असताना पुणे इंदौर या एक्सप्रेस गाडीची धडक बसल्याने हुलावळे व चौधरी यांचा जागीच मृत्यु झाला. ह्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी रेल्वे फाटक बंद असताना मार्ग ओलांडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.