Kasarsai Dam: कासारसाई धरणात २ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 17:04 IST2022-03-03T17:02:33+5:302022-03-03T17:04:53+5:30

विद्यार्थी बिहार राज्यातील असून आकुर्डी येथील डी.वाय. पाटील आभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होते

Two engineering students drown in Kasarasai dam | Kasarsai Dam: कासारसाई धरणात २ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Kasarsai Dam: कासारसाई धरणात २ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

चांदखेड : कासारसाई धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला. शशांक सिन्हा (वय १९), रविकुमार विनोदकुमार (१९) या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत. ते आकुर्डी येथील डी.वाय. पाटील आभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होते. ते गुरुवारी (दि. ३) सकाळी दहाच्या सुमारास इतर चार मित्रांसह फिरण्यासाठी कासारसाई धरण परिसरात आले होते. त्यावेळी ते धरणच्या पाण्याशेजारी उभे होते. त्यातील तीन जण पाय घसरुन पाण्यात पडले. त्यातील एकाला उर्वरित मित्रांनी बाहेर काढले, मात्र पाणी खोल असल्याने शशांक व रविकुमार हे बुडाले. त्यांना स्थानिक तरुणांनी पाण्याबाहेर काढले असता त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणी शिरगाव परदंवडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Two engineering students drown in Kasarasai dam