वाहतूक विभागातर्फे दिवसभरात २७२ रिक्षाचालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 04:00 PM2019-09-04T16:00:15+5:302019-09-04T16:11:46+5:30

शहरातील काही रिक्षाचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

Traffic department action on 272 rickshaws in the day | वाहतूक विभागातर्फे दिवसभरात २७२ रिक्षाचालकांवर कारवाई

वाहतूक विभागातर्फे दिवसभरात २७२ रिक्षाचालकांवर कारवाई

googlenewsNext

पिंपरी : गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक विभागातर्फे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यात मंगळवारी (दि. ३) २७२ तर जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ९९९८ रिक्षांवर कारवाई झाली आहे. 
शहरातील काही रिक्षाचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गणवेश नसणे, बॅचबिल्ला नसणे, रिक्षा चालविण्याचा परवाना नसणे, क्षमतेपेक्षा जास्त किंवा अवैध प्रवासी वाहतूक करणे, कागदपत्रांची पुर्तता करू न शकणे आदी कारणांस्तव रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे.
पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे मंगळवारी कारवाई झाली. त्यात सर्वाधिक ७३ कारवाई चाकणला झाली. हिंजवडी येथे ५३ रिक्षाचालकांवर कारवाई झाली. सांगवी विभागातर्फे मंगळवारी एकही कारवाई करण्यात आली नाही. यंदा जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान चाकण येथे ३११५ तर हिंजवडी येथे २६३५ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. दिघी-आळंदी वाहतूक विभागातर्फे सर्वात कमी १८१ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.

रिक्षाचालकांवर करण्यात आलेली कारवाई -
        जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान    मंगळवारी झालेली कारवाई 
सांगवी        ९४५                                        निरंक
हिंजवडी         २६३५                ५३
निगडी         ३४७                ३१
पिंपरी        ५९३            ३०
भोसरी         ९०४                ०३
चिंचवड        १३३                २६
चाकण         ३११५                ७३
देहूरोड-तळेगाव    ८०१            १५
दिघी-आळंदी    १८१            १६
तळवडे        ३४४                २५

Web Title: Traffic department action on 272 rickshaws in the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.