शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनविक्रीचा 'टॉप गिअर'; मिळाला 'इतका' कोटी महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 19:27 IST

दसऱ्याच्या मुहूर्तावर साडेतीन हजार वाहनांची नोंद ..

ठळक मुद्देदसऱ्याच्या मुहूर्तावर ‘आरटीओ’कडून वाहन नोंदणीसाठी कार्यालयीन कामकाज सुरू

पिंपरी : लॉकडाऊन शिथिल होऊन अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वाहन खरेदीचा टॉप गिअर दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात चैतन्याचे वातावरण आहे. ही संधी साधत सुटी असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘आरटीओ’कडून वाहन नोंदणीसाठी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर साडेतीन हजार वाहनांची नोंद करण्यात आली असून २४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. वाहन नोंदणी, आकर्षक क्रमांक, वाहन हस्तांतरण अशा विविध कारणांसाठी या आठवड्यात पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढली होती. गत वर्षीपेक्षा वाहन नोंद कमी झाली असली तरी ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू होताच वाहन विक्रीत वाढ होत आहे. ही दिलासादायक बाब असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. 

सण-उत्सवानिमित्त वाहन कंपन्यांकडून सवलत व विविध योजना जाहीर केल्या जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा योजना व सवलत मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या होत्या. त्याचा लाभ घेण्यासाठी व शुभमुहूर्तावर वाहन खरेदीची हौस पूर्ण करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू होती. तसेच वाहन नोंदणी विभाग आणि आकर्षक क्रमांक मिळावेत म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू होते. दस-यानिमित्त शासकीय कार्यालये बंद असतात. त्यात यंदाचा दसरा रविवारी होता. असे असतानाही ग्राहकांना दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन मिळावे आणि दुसरीकडे आरटीओ कार्यालयातील महसूल वाढविण्यासाठी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यात आले होते.  दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी या आठवडयात पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान १९२३ दुचाकी तर, १४६० चारचाकी वाहनांची नोंद झाली. तसेच २४७ इतर अशी एकूण ३३६० वाहनांची नोंदणी झाली. या माध्यमातून २४ कोटी १३ लाख ४९ हजार १२८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर, दस-याच्या दिवशी अर्थात रविवारी एकूण १०७ वाहनांची नोंद झाली. यातून रविवारी एक कोटी ४२ हजार २७५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. ----वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. सणउत्सवानिमित्त मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती दिली जाते. त्यासाठी सुटीच्या दिवशीही वाहन नोंदणी केली. आकर्षक क्रमांकाच्या नोंदणीतून चांगला महसूल प्राप्त झाला. - अतूल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, 

पिंपरी-चिंचवड १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यानची वाहन नोंदणी दुचाकी १९२३ चारचाकी १४६० इतर २४७ प्राप्त महसूल - २४ कोटी ४२ लाख

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर