शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतून महागड्या गाड्यांची चोरी अन् पिंपरीत विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 13:05 IST

आरोपींनी ही वाहने चोरून आणून त्यांच्या चेसी व इंजिन क्रमांकामध्ये फेरफार केल्याचे उघड

ठळक मुद्देआंतरराज्य टोळीचा पर्दाफाश : १५ इंजिनसह १२ चारचाकी वाहने जप्त 

पिंपरी : विमा कंपनीच्या वेबसाइटवरून भंगार वाहने ऑनलाइन खरेदी करून त्यांच्या आरटीओ क्रमांकाचा वापर चोरीच्या वाहनांसाठी करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही चोरीची महागडी वाहने लाखो रुपयांना विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील एका चोरट्याला अटक करून त्याच्याकडून १५ इंजिनसह १२ चारचाकी वाहने, असा दोन कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.चनप्रित हरविंदरपाल सिंह (वय ४३, रा. रावेत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक रस्त्यावर गणेशनगर, रावेत येथे एका पंजाबी व्यक्तीचे गॅरेज आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार २६ जानेवारी रोजी पोलिसांनी गॅरेजवर छापा टाकून आरोपी चनप्रित सिंह याला ताब्यात घेतले. त्यानंतर गॅरेजची पाहणी केली असता, गॅरेजमध्ये दोन चारचाकी वाहने मिळून आले.तसेच गाड्यांचे सुटे पार्ट व अनेक इंजिन दिसून आले. त्या वाहनांवर महाराष्ट्रातील आरटीओ पासिंगचा क्रमांक होता. परंतु त्याच्या इंजिन क्रमांकावरून ते वाहन पंजाब राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच इतर चारचाकी वाहनांवरील क्रमांकही खोटा असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे आरोपींनी ही वाहने चोरून आणून त्यांच्या चेसी व इंजिन क्रमांकामध्ये फेरफार केल्याचे उघड झाले. ........................

विमा कंपन्यांकडून खरेदी केलेल्या वाहनांच्या नंबरप्लेटचा गैरवापर आरोपी चनप्रित सिंह व त्याचा साथीदार असे दोघांचे भागीदारीमध्ये रावेत येथे गॅरेज आहे. अपघातामध्ये नुकसान झालेली वाहने भंगारात विकण्यात येतात. संबंधित विमा कंपनीकडून अशी भंगार वाहने त्यांच्या वेबसाइटवरून ऑनलाइन विक्री केली जातात. ही वाहने कागदपत्रांसह आरोपी ऑनलाइन विकत घेत असत. विकत घेतलेल्या गाडीच्या मॉडेलची व रंगाची चारचाकी गाडी पंजाब, हरियाणा, दिल्ली व इतर राज्यांतून चोरी करून आणून त्या गाडीवर अ‍ॅक्सिडेन्ट झालेल्या गाडीचा चेसी नंबर असलेला भाग लावून गाडीची पुन्हा विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbikeबाईकAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक