चाकण, दिघी, चिखली, तळेगाव एमआयडीसी परिसरात चार वाहनांची चोरी; गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:15 PM2021-08-06T22:15:47+5:302021-08-06T22:16:09+5:30

संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल

Theft of four vehicles in Chakan, Dighi, Chikhali, Talegaon MIDC area; Crime filed | चाकण, दिघी, चिखली, तळेगाव एमआयडीसी परिसरात चार वाहनांची चोरी; गुन्हे दाखल

चाकण, दिघी, चिखली, तळेगाव एमआयडीसी परिसरात चार वाहनांची चोरी; गुन्हे दाखल

Next

पिंपरी : चाकण, दिघी, चिखली, तळेगाव एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार वाहनांची चोरी केली आहेत. याप्रकरणी गुरुवारी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निर्मला सुनील मुंगसे (वय ३८, रा. महाळुंगे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुंगसे यांची मोपेड दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आला.

रमेशकुमार ताराचंद साहू (वय ३५, रा. मोशी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी चऱ्होली फाटा येथे ३१ जुलैला सकाळी नऊ वाजता पार्क केली. दुपारी अडीच वाजता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

राम एकनाथ हाके (वय ३५, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हाके यांनी त्यांची दुचाकी २९ जुलैला दुपारी एक वाजता ताम्हाणे वस्ती येथील सावतामाळी मंदिरासमोर पार्क केली. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

नरसिमा नारायण रेड्डी (वय ५४, रा. विकासनगर, देहूरोड, मूळ रा. आंध्र प्रदेश) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रेड्डी यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी फिर्यादी त्यांनी चार जुलै रोजी सकाळी नऊ वाजता नवलाख उंब्रे गावच्या हद्दीत एल अँड टी कंपनीच्या मोकळ्या पार्किंगमध्ये पार्क केली. दुपारी तीन वाजता ते कंपनीतून बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

Web Title: Theft of four vehicles in Chakan, Dighi, Chikhali, Talegaon MIDC area; Crime filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.