चिंचवडमध्ये चितळे मिठाईवाल्यांच्या दुकानात चोरी; अजून दोन दुकानांवरही मारला डल्ला

By रोशन मोरे | Updated: April 17, 2023 16:04 IST2023-04-17T16:03:56+5:302023-04-17T16:04:06+5:30

चितळेंबरोबरच इतर दोन दुकाने मिळून तब्बल ६८ हजारांचा माल चोरून नेला

Theft at Chitale Sweets shop in Chinchwad Two more shops were also attacked | चिंचवडमध्ये चितळे मिठाईवाल्यांच्या दुकानात चोरी; अजून दोन दुकानांवरही मारला डल्ला

चिंचवडमध्ये चितळे मिठाईवाल्यांच्या दुकानात चोरी; अजून दोन दुकानांवरही मारला डल्ला

पिंपरी : पुनावळेमध्ये येथील चार दुकानांमध्ये चोरट्यानेचोरी करत रोख रक्कम तसेच चांदीचे नाणी चोरून नेली. घटना शनिवारी (दि.१५) रा्त्री साडेनऊ ते रविवारी (दि.१६) सकाळी सातच्या दरम्यान पुनावळेमधील चितळे मिठाईवाले, न्यू पुना बेकरी, श्रीपाद हार्डवेअर या दुकानांमध्ये घडली. या प्रकरणी वैभव विद्याधर अफजलपूरकर (वय ३३, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या चितळे मिठाईवाले तसेच न्यू पुना बेकरी नावाच्या दुकानांच्या लोखंडी शटर उचकटून चोरी केली. तसेच साक्षीदार आदित्य काकडे यांच्या श्रीपाद हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून चोरी केली. आरोपीने श्रीपाद हार्डवेअर दुकानातून २५ हजार ७८० रुपये रोख, पाच हजार रुपये किंमतीचे चांदीचे नाणी, पुना बेकरी दुकानातील गल्यातील ३० हजार रुपये रोख तसेच आदित्य हार्डवेअर आणि चितळे मिठाईवाले दुकानातून आठ हजार रुपये रोख असा ६८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Theft at Chitale Sweets shop in Chinchwad Two more shops were also attacked