निगडीमधील नवीन भुयारी मार्ग बनलाय दारूचा अड्डा, स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रकार समोर

By विश्वास मोरे | Published: April 15, 2024 06:17 PM2024-04-15T18:17:15+5:302024-04-15T18:22:30+5:30

या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे....

The new subway in Nigdi has become a liquor den, a sting operation is underway | निगडीमधील नवीन भुयारी मार्ग बनलाय दारूचा अड्डा, स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रकार समोर

निगडीमधील नवीन भुयारी मार्ग बनलाय दारूचा अड्डा, स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रकार समोर

पिंपरी :  पुणे-मुंबई जुना महामार्गावर निगडीत नवीन भुयारी मार्ग उभारला आहे. तो असुरक्षित आहे. या ठिकाणी दिवसाढवळ्या दारू प्यायली जाते. याबाबत सामाजिक संस्थांनी स्टिंग ऑपरेशन केले. दारुड्यामुळे येथे नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे.

निगडीमधील मुंबई-पुणे महामार्गावरील निगडित भुयारी मार्ग सुरु केला आहे. हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे. या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूस मिळून एकूण ८ शाळा आहेत, तसेच नागरिकांना हायवे ओलांडून पलीकडे जाणे धोकादायक होते, म्हणून हा भुयारी मार्ग बांधण्यात आला. परंतु, या भुयारी मार्गामध्ये चुकीचे प्रकार घडत आहेत. याबाबत येथील सामाजिक संस्थांनी दुपारी आणि रात्री पाहणी केली त्यात या ठिकाणी दारू पीत असल्याचे दिसून आले.

भुयारी मार्ग धोक्याचा वाटू लागला

जवळच असलेल्या झोपडपट्टीमधील टवाळखोर पोर दिवसाढवळ्या तिथे दारू प्यायला बसतात. रात्रीच्या वेळेस या दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढते. तसेच बऱ्याच वेळेस यथे मोठ्या प्रमणात कचरा टाकलेला आढळून आलेला आहे. या रस्त्याचा वापर हा सर्व नागरिक तसेच महिला करत असतात. आता महिलांना हा भुयारी मार्ग धोक्याचा वाटू लागला आहे. भुयारी मार्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा रक्षक मिळावे, येथील असलेलय गैरकृर्त्यांना आळा बसेल, अशी मागणी माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी केली आहे.

श्री खंडोबा व्यापारी संघटनेच्या वतीने महापालिका आणि पोलिसांना पत्र दिले आहे. त्यावर अध्यक्ष रोहिदास शिवणेकर, उपाध्यक्ष केतूल सोनिगरा, राजेंद्र काळभोर, सचिव राजू बाबर, बाळा दानवाले, अप्पा काळभोर, शैलेश गाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: The new subway in Nigdi has become a liquor den, a sting operation is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.