शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांच्या राजकीय ‘एबीसीडी’ला प्रारंभ

By admin | Updated: July 13, 2015 04:05 IST

मावळ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारपासून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे

गहुंजे : मावळ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारपासून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींसाठी तरुणांच्या राजकीय ‘एबीसीडी’ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी वॉर्डांतील मतदारांची संख्या पडताळून आर्थिक जुळवाजुळव सुरू केली आहे. निवडणूक कार्यकम जाहीर झाला आहे. पाच वषार्नंतर नव्या जोमाने निवडणुकीत तरुणाईसह इतर भाग घेणार आहेत. आचारसंहिता लागली असून, गावागावांत निवडणूक वारे वाहू लागले आहे. सायंकाळी गावांतील पारावर पावसाच्या प्रतीक्षेची व राजकीय चर्चा रंगत आहेत. राजकीय वातावरण तापू लागले आहे. सरपंचपदाचे आरक्षणही निघाले आहे. ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण जाहीर झाले आहेत. त्यामुळे आपल्या सौभाग्यवतीची किंवा कुटुंबातील महिलांची व इतरांची जात प्रमाणपत्र काढून घेण्यात येत आहेत. आॅनलाइन अर्ज भरणे, छाननी अर्ज मागे घेणे, निवडणूक चिन्ह मिळणे या प्रक्रिया झाल्यानंतर राजकीय मंडळी यश मिळविण्यासाठी गावात साम, दाम, दंड, भेद या अस्त्रांसह आपल्या पॅनलचा झेंडा फडकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया मानल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणूकीची राजकीय एबीसीडी सुरू झाली आहे.पुढारी वॉर्डावॉर्डांत आपल्या पॅनलमधील उमेदवार निवडण्यासाठी सरसावले आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी त्यांच्यासह गावांतील इतर पुढारी गावाची ग्रामपंचायतीचा धुरा आपल्या हातात राहावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. मागील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची गोळाबेरीज सुरूकेली आहे. विविध गावांत तरुणाईने, व्हॉट्स अ‍ॅपचा ग्रुप तयार करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. (वार्ताहर)