Pimpri Crime: लघुशंकेला थांबलेल्या एकावर कोयत्याने वार; गंभीर जखमी करून १० हजार लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 03:48 PM2022-03-08T15:48:16+5:302022-03-08T15:49:26+5:30

रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी थांबलेल्या पेंटरला दोघांनी कोयत्याने वार करून लुटले

Stabbing one who stopped urinating 10,000 were seriously injured and looted | Pimpri Crime: लघुशंकेला थांबलेल्या एकावर कोयत्याने वार; गंभीर जखमी करून १० हजार लुटले

Pimpri Crime: लघुशंकेला थांबलेल्या एकावर कोयत्याने वार; गंभीर जखमी करून १० हजार लुटले

googlenewsNext

पिंपरी : रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी थांबलेल्या पेंटरला दोघांनी कोयत्याने वार करून लुटले. ही घटना रविवारी (दि. ६) रात्री पावणे अकरा वाजता चाकण शिक्रापूर रोडवर घडली.

मोरेश्वर उर्फ मनोज विठ्ठल पांचाळ (वय ३२, रा. भोसे, ता. खेड. मूळ रा. लातूर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पेंटींगचे काम करतात. रविवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ते चाकण शिक्रापूर रोडने जात होते. रासे गावच्या हद्दीत ते लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूला थांबले असता दुचाकीवरून दोन अनोळखी आरोपी आले. त्यांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादीचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा १० हजारांचा ऐवज घेऊन आरोपी पळून गेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Stabbing one who stopped urinating 10,000 were seriously injured and looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.