ST collision with a truck parked on the side of the road; The conductor died on the spot | रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला एसटीची धडक ; वाहकाचा जागीच मृत्यू
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला एसटीची धडक ; वाहकाचा जागीच मृत्यू

पुणे  : धुक्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रक एसटी चालकाला दिसला नाही. त्यामुळे भरधाव एसटी ट्रकला मागून जाेरात धडकली. यात एसटीच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन प्रवासी जखमी झाले आहेत. याप्रकरणी एसटी चालकाला दाेषी धरुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर भाेसरी पाेलीस स्टेशनच्या समाेर एक ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा हाेता. पहाटे चाडेचार वाजता रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक एसटी चालकाला न दिसल्याने एसटीची ट्रकला मागून जाेरदार धडक बसली. या धडकेत वाहक अंबादास दिनकर खेडकर (वय-३२) यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. धुळे आगारातील बस (एम.एच-२० बी.एल-३४२६)  साक्रीहुन पुण्याच्या दिशेने निघाली होती. याप्रकरणी एसटी चालकाला दाेषी धरत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. भाेसरी पाेलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: ST collision with a truck parked on the side of the road; The conductor died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.