भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, पिंपरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:49 IST2026-03-17T13:48:37+5:302026-03-17T13:49:01+5:30

हायवा ट्रकचा चालक आणि मालक दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

Speeding truck hits two-wheeler; 15-year-old boy dies, incident in Pimpri | भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, पिंपरीतील घटना

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, पिंपरीतील घटना

पिंपरी : भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पुनावळे परिसरात जांभे रस्त्यावर शनिवारी (दि. १४ मार्च) सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. स्वप्नील पिंटू चव्हाण (वय १५) असे अपघातातमृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. लक्षदीप दिलीप राठोड (१७) यांनी याबाबत रविवारी (दि. १४ मार्च) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 समाधान रामदास माने (२७, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याच्यासह हायवा ट्रकचा मालक किरण मोहनराव काकडे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचा नातेवाईक स्वप्नील हे दोघेजण शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्वप्नीलचा मृत्यू झाला.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १४ मार्च) रात्री सव्वादहाच्या सुमारास चिखली येथील संविधान चौकाजवळ घडली. रवींद्र पांडुरंग सांगळे (वय ५०) यांचा या अपघातात मृत्यू झाला. जितेंद्र रामसंजीवन पटेल (वय ३५, रा. इंदोरी, तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे, मूळ रा. मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. सांगळे शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सांगळे यांचा मृत्यू झाला.

Web Title : पिंपरी: तेज़ रफ्तार ट्रक ने बाइक को मारी टक्कर, 15 वर्षीय लड़के की मौत

Web Summary : पिंपरी में, एक तेज रफ्तार ट्रक ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे 15 वर्षीय लड़के की मौत हो गई। चिखली में एक अन्य दुर्घटना में एक ट्रक की टक्कर से 50 वर्षीय मोटरसाइकिल सवार की जान चली गई। पुलिस ने ट्रक चालकों को गिरफ्तार कर मालिकों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है।

Web Title : Pimpri: Speeding Truck Hits Bike, 15-Year-Old Dies in Accident

Web Summary : In Pimpri, a speeding truck fatally struck a motorcycle, killing a 15-year-old. Another accident in Chikhli claimed the life of a 50-year-old motorcyclist due to a truck collision. Police have arrested the truck drivers and filed cases against the owners.