शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

व्यायामशाळा साहित्याची दुप्पट दराने खरेदी

By admin | Updated: July 28, 2015 00:46 IST

महापालिकेने संभाजीनगर उद्यानातील व्यायामशाळेसाठी थेट पद्धतीने व दुप्पट दराने साहित्यांची खरेदी केली जाणार असून, साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविता

पिंपरी : महापालिकेने संभाजीनगर उद्यानातील व्यायामशाळेसाठी थेट पद्धतीने व दुप्पट दराने साहित्यांची खरेदी केली जाणार असून, साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविता येऊ नये काय, दुप्पट दराच्या खरेदीमागील गौडबंगाल काय, असा प्रश्न नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी केला आहे. करदात्यांचे पैसे संबंधितांकडून वसूल करावेत, अशी मागणी त्यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने साहित्य खरेदी करण्याचा धडाका लावला आहे. शिलाई मशिन, नोटा मोजणे, सोनोग्राफी मशिननंतर आता व्यायामशाळेतील साहित्य खरेदीतही गैरव्यवहार होत असल्याचे सावळे व शेडगे यांनी उघडकीस आणले आहे. सावळे म्हणाल्या, ‘‘संभाजीनगर येथील व्यायामशाळेसाठी पक्षनेत्या मंगला कदम यांनी १६ मे रोजी आयुक्तांना एकाच वेळी दोन वेगवेगळी पत्रे पाठवून व्यायामसाहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पत्रासोबत ट्रेड मिल दोन नग, इलिप्टिकल्स दोन नग, अपराइट बाइक दोन नग, वेट मशिन दोन नग, योगा मॅट ३० नग, ट्यूस्टर हेवी ड्यूटी एक नग, डंबेल्स रॅक एक नग, सोनी म्युझिक सिस्टिम पेन ड्राइव्हसह एक नग आदी साहित्यांची यादी त्यांनी जोडली. पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी क्रीडा अधिकाऱ्याने साहायक आयुक्तांना पत्र पाठवून व्यायामशाळेसाठी भांडार विभागाकडे साहित्याची मागणी नोंदविणे राहून गेल्याचे म्हटले आहे. साहित्याची खरेदी करावी, असे त्यात नमूद केले.त्यानंतर पुरवठादारांकडून दरपत्रक मागविले. त्यामध्ये आकुर्डीतील पुरवठादाराने कमी दराचे दरपत्रक दिले आहे. या दरपत्रकानुसार साहित्यांची एकूण किंमत चार लाख रुपये होते. तीन लाखांपेक्षा जास्त खरेदी करावयाचे झाल्यास निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. त्यामुळे क्रीडा विभागाने या साहित्यांच्या खरेदीसाठी दोन वेगवेगळे प्रस्ताव तयार करण्याची शाळा केली.(प्रतिनिधी)