पिंपरीतील धक्कादायक घटना! 'तू वेडा आहे' अशा किरकोळ चिडवण्यावरून टोळक्याकडून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 16:04 IST2021-08-09T16:04:19+5:302021-08-09T16:04:29+5:30

पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक

Shocking incident in Pimpri! Murder of a young man by a mob for minor teasing like 'You are crazy' | पिंपरीतील धक्कादायक घटना! 'तू वेडा आहे' अशा किरकोळ चिडवण्यावरून टोळक्याकडून तरुणाचा खून

पिंपरीतील धक्कादायक घटना! 'तू वेडा आहे' अशा किरकोळ चिडवण्यावरून टोळक्याकडून तरुणाचा खून

ठळक मुद्देबेदम मारहाणीने जखमी झाल्यावर तरुणाचा मृत्यू झाला

पिंपरी : तू वेडा आहे, असे वारंवार चिडवल्याने तरुणाने काठीने मारहाण केली. त्या कारणावरून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करून जखमी केले. या घटनेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मिलिंदनगर, डिलक्स चौक, पिंपरी येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

मनोज राजू कसबे (वय २५), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पुष्पा राजू कसबे (वय ५०, रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. काळ्या उर्फ सचिन निकाळजे (वय ४०), शौकत समीर शेख (वय ३२, दोघे रा. मिलिंदनगर, पिंपरी), चिम्या उर्फ सुरेश निकाळजे, मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल व इतर साथीदार (सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी काळ्या आणि शौकत या दोघांना पोलिसांनीअटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा कसबे यांचा मुलगा मनोज कसबे याला आरोपींनी ‘तू वेडा आहे’, असे वारंवार चिडवले. मी वेडा नाही तुम्हीच वेडे आहात, असे मनोज म्हणाला. त्यानंतरही आरोपींनी त्याला वारंवार चिडवल्याने मनोजने त्यांना काठीने मारहाण केली. या कारणावरून आरोपींनी मनोजला प्लास्टिकची खुर्ची, लाकडी स्टंप, लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. त्यात मनोजचा मृत्यू झाला.

Web Title: Shocking incident in Pimpri! Murder of a young man by a mob for minor teasing like 'You are crazy'