सातवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2015 06:35 IST2015-06-09T05:39:58+5:302015-06-09T06:35:15+5:30

सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना चिखली येथे घडली.

Sexual Harassment on Seven Years Child | सातवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

सातवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : सातवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना चिखली येथे घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : ४ जूनला दुपारी दोनच्या सुमारास पीडित बालिका घरासमोर खेळत होती. दरम्यान, सतरावर्षीय मुलगा बालिकेला सोबत घेऊन गेला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास धमकी दिली. दरम्यान, पीडित बालिकेने घरी आल्यानंतर याबाबत आईला सांगितले. त्यानंतर तिची आई मुलाच्या घरी गेली असता, मुलाच्या आई-वडिलांनी त्यांना पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
दाम्पत्यास मारहाण
दौंड : पेडगाव (ता. दौंड) येथील वयोवृद्ध दाम्पत्यास शुक्रवारी (दि. ५) मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केली असल्याची माहिती सहायक फौजदार दिनेश कुलकर्णी यांनी दिली.
हरिभाऊ मारुती कांबळे (वय ७१), जनाबाई हरिभाऊ कांबळे ( दोघे रा. मेरगळवस्ती, पेडगाव) अशी त्यांची नावे आहेत़ दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कांबळे दाम्पत्य गाढ झोपेत असताना चोरट्यांनी दरवाजा तोडला. (वार्ताहर)

Web Title: Sexual Harassment on Seven Years Child