शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीबाबत हरकती पाठवा

By admin | Updated: July 27, 2015 03:47 IST

पन्नास कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या उद्योगांच्या नोंदणीबाबतच्या नियमावलीत सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार

पिंपरी : पन्नास कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या उद्योगांच्या नोंदणीबाबतच्या नियमावलीत सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या एलबीटी विभागाने सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. शहरातील व्यापारी, तसेच उद्योजकांकडून महिनाअखेरपर्यंत सूचना, हरकती पाठवाव्यात, असे आवाहन एलबीटी विभागाने केले आहे.जकात रद्द करून एलबीटी आणि आता एलबीटी रद्द करून नवीन जीएसटी कर लागू करण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासन विचार करीत आहे. एक आॅगस्टपासून जीएसटी लागू होईल, अशी घोषणा महाराष्ट्र शासनाने केली होती. मात्र, या संदर्भात अद्याप राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तूर्त तरी महापालिकेत एलबीटी आकारणी होणार आहे. दरम्यान, करआकारणीविषयीच्या एलबीटीच्या २०१०च्या नियमावलीत सुधारणा करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. वार्षिक पन्नास कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्यांना एलबीटी लागू होणार नाही. त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेल्यांना कर लागू करण्यासंदर्भात नोंदणीच्या नियमातील बदलासंदर्भातील प्रस्ताव सरकारपुढे आहे. या संदर्भातील अधिसूचनेचा आदेश महापालिकेस प्राप्त झाला आहे. नोंदणीची नवीन नियमावली करण्यासंदर्भात महापालिकांनी उद्योजक, व्यापाऱ्यांकडून सूचना व हरकती मागवाव्यात, असा आदेश मिळाल्याने एलबीटी विभागाने त्या मागविल्या आहे. पूर्वीच्या बांधकाम विभागात फर्निचर मांडायलाही जागा नसल्यामुळे कागदपत्रे, खुर्च्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. फर्निचर एवढे आहे की, त्यामुळे या विभागातून चालायलाही कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे बांधकाम परवाना विभागात नवीन फर्निचरचे काम सुरू आहे. एलबीटी विभागाच्या जुन्या केबिन काढून स्वतंत्र केबिन बनविण्याचे काम सुरू आहे. एलबीटी रद्द झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. महापालिकेला उत्पन्नासाठी नवीन स्रोत शोधावे लागणार आहेत. तसेच अनेक योजनाही खोळांबतील अशी भीती व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)