PCMC मधील कथिक घोटाळ्याची तक्रार करण्यासाठी खा. बारणे ईडीच्या दिल्लीच्या कार्यालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 13:11 IST2021-11-02T12:54:22+5:302021-11-02T13:11:22+5:30
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महापालिकेतील कथिक घोटाळ्याप्रकरणी दिल्लीत जाऊन ईडीकडे तक्रार केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये 700 कोटींचा घोटाळा ...

PCMC मधील कथिक घोटाळ्याची तक्रार करण्यासाठी खा. बारणे ईडीच्या दिल्लीच्या कार्यालयात
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महापालिकेतील कथिक घोटाळ्याप्रकरणी दिल्लीत जाऊन ईडीकडे तक्रार केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (shrirang barne) दिल्लीच्या ईडी कार्यालयात गेले आहेत.
महापालिकेत स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. यामध्ये शहराचा विकास होत नाही. इथं भ्रष्टाचाराला पोषक वातावरण तयार केलं जातंय. या भ्रष्टाचारात स्थानिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. ठेकेदार केवळ नावापुरता राहिले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.