शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

चिखलीत दरोड्याचा प्रयत्न :पाच लाखांची  मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 2:40 PM

भांड्याच्या दुकानात घुसून पाच जणांच्या टोळक्यांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे पाच लाखांची  मागणी केली

पिंपरी :भांड्याच्या दुकानात घुसून पाच जणांच्या टोळक्यांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे पाच लाखांची  मागणी केली. तसेच दुकानातील भांडी रस्त्यावर फेकून देत गल्ल्यात जमा झालेली ७ हजार ३०० रुपयांची रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास साने चौकातील साईबाबा मंदिराजवळील भांड्याच्या दुकानात घडली.             या प्रकरणी दुकानाचे मालक अमित महादेव साठे (वय १८, रा. भीमशक्तीनगर, स्पाईन रोड, साने चौक, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बंड्या, सुजित, आकाश, संतोष, गणेश या पाच आरोपीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित यांचे साने चौकातील साईबाबा मंदिराजवळ भांडी विक्रीचे दुकान आहे. दुकानावर त्याचे मेहुणे आणि आई असतात. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अमित याचे मेहुणे आणि आई दुकानावर असताना बंड्या, सुजित, आकाश, संतोष आणि गणेश हे पाचही आरोपी त्यांच्या दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागीतली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुकानातील विक्रीसाठी ठेवलेली भांडी फेकून दिली. तसेच दुकानाच्या गल्ल्यात जमा झालेली ७ हजार ३०० रुपयांची रक्कम जबरदस्तीने चोरुन फरार झाले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDacoityदरोडा