शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 2:36 PM

Swami Samartha: ६ मे रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथि आहे, त्यादिवशी स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याबरोबर स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी सोडल्या तर स्वामीकृपेस पात्र होऊ!

आपण स्वामींची पूजा करतो, उपासना करतो, ते सदैव सोबत राहावेत अशी त्यांच्याकडे प्रार्थना करतो. स्वामींची कृपादृष्टी मिळावी म्हणून आपण त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण करतो. मात्र खुद्द स्वामींना आवडणारी गोष्ट कोणती ते जाणून घेऊ. 

घराघरातल्या भिंतींवर सुविचार, तसबिरी, प्रेरक विचार लावलेले असतात. का? तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून! परंतु, आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात. मात्र, कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे, त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो. पैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे-

कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका,मोठ्याने बोलू नका,मन शांत ठेवा, विचार करा,नंतर अंमलबजावणी करा,त्रास फक्त तुम्हालाच, मन:शांती सुद्धा तुम्हालाच!विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशिब बदलेल.

हे विचार नित्य आचरणात आणले, तर आपले आयुष्यच बदलून जाईल. आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो. भांडण-तंटे होतात. अपशब्द काढले जातात. वैरभाव निर्माण होतो. रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मन:स्वाथ्य बिघडते आणि वरचेवर रागावण्याच्या, मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इ. आजारांना शरीरात स्थान मिळते. आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरु होतो. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू ओढावतो. हे प्रकरण तिथे थांबत नाही, तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते.

यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागावू नका. राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते, परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली, तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते. सरावाने राग नियंत्रणात आणता येतो. त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे. 

रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, जे ध्यानी-मनीही नसते, तेही बोलून जातो. याचा परिणाम म्हणजे, तो क्षण निसटून जातो, पण शब्द मागे राहतात. यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा. विचार करा. विचार कसला? तर खरेच रागावण्याची गरज आहे का? माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का? रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का? या गोष्टींचा विचार केला, तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे, त्याची तीव्रता कमी होईल. मन शांत होईल. एखादवेळेस तुम्हाला हे जमले, की कायमस्वरूपी तुम्ही स्वत:च्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल. त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही. 

या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे, ते म्हणजे ` विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशिब बदलेल.' आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चात्तापाला कारणीभूत ठरते. म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील, तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे. आपण जी कृती करतो, त्याला आपले विचार कारणीभूत असतात. म्हणून, आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे. त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे. आपोआप आपल्या स्वभावात, कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागेल. तसेच आपली स्वामी भक्ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल!

स्वामींची ही शिकवणी आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया.