शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी सहभागासाठी सव्वादोनशे सूचना प्राप्त

By admin | Updated: July 13, 2015 03:59 IST

महापालिकेकडे स्मार्ट सिटी सहभागाबाबत २२५ सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या सूचनेच्या आधारे महापालिकेने स्मार्ट सिटीसाठीची प्रवेशिका तयार केली आहे.

पिंपरी : महापालिकेकडे स्मार्ट सिटी सहभागाबाबत २२५ सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या सूचनेच्या आधारे महापालिकेने स्मार्ट सिटीसाठीची प्रवेशिका तयार केली आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना जाहीर केली आहे. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा त्यामध्ये समावेश केला आहे. त्यासाठी १५ निकष आहेत. त्यानुसार शहरे समाविष्ट केली जाणार आहेत. निवड झाल्यानंतर या शहरांना राज्य सरकारकडून १५० कोटी, तर महापालिकेकडून ५० कोटी असा एकूण २०० कोटींचा निधी मिळणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रभागनिहाय सभा घेण्यात आल्या. त्यात नागरिक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या. सिटी वायफाय व्हावी, पथदिव्यांसाठी सौरदिव्यांचा वापर करावा, शहरात पिंपळ व चिंच वृक्षलागवड करावी, ओला व सुका कचरा शंभर टक्के विघटनाची सोय करावी, सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे असावीत, उद्यानामध्ये स्वच्छतागृह उभारावीत, महापालिकेने सर्व शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या कराव्यात आदी सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त सूचनांमध्ये ‘ब’ प्रभाग कार्यालयाकडून ८८ सूचना प्राप्त झाल्या आहेत. तर ‘ई’ कार्यालयांतर्गत फक्त ११ सूचना मिळाल्या आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाकडून ३६, ‘क’ मधून ४०, ‘ड’ मधून २६, ‘फ’ मधून २४ सूचनांचा समावेश आहे. हा अहवाल ३० जुलैपर्यंत शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)