शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘रावेतला महिलांसाठी स्वच्छतागृह उभारा’

By admin | Updated: July 27, 2015 03:49 IST

वाल्हेकरवाडी शिवाजी चौक, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, बिजलीनगर, रावेत परिसर आदी ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे

रावेत : वाल्हेकरवाडी शिवाजी चौक, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, बिजलीनगर, रावेत परिसर आदी ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेत समावेश होऊन अनेक वर्षे होऊनसुद्धा अद्यापपर्यंत महापालिकेला महिला स्वच्छतागृह बांधता आले नाहीत. महिला सबलीकरणासाठी पालिका विविध प्रकारचे धोरण राबविताना आवश्यक त्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची निर्मिती काकरीत नाही, असा प्रश्न महिलांना पडला आहे. वाल्हेकरवाडीतील मुख्य शिवाजी चौकात महापालिकेची शाळा, महापालिकेचे रुग्णालय, भाजीविक्रेते, पीएमपीलचा मुख्य बस स्टॉप आदी सतत वर्दळ असणारे ठिकाण आहे. येथे इतर ठिकाणी कामानिमित्त जाणाऱ्या महिला प्रवाशांची गर्दी अधिक असते. त्यामुळे या मुख्य चौकात महिलांसाठी स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. गुरुद्वारा चौकात नेहमी विद्यार्थिनींची परिसरातील विविध महाविद्यालयांत जाण्यासाठी सतत गर्दी असते. येथेही महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिला व विद्यार्थिनींची कुचंबणा होते. परंतु, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. ही गैरसोय केवळ पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्ण होत नाही, अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.एकता महिला बचत गटाच्या अध्यक्षा उमा माळी म्हणाल्या, ‘‘परिसरातील महिलांना कामानिमित्त बाहेर सतत जावे लागते. महिलांच्या आरोग्याशी संबंधित महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न असून, या संदर्भात पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी दखल घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करून महिलांची व विद्यार्थिनींची होणारी गैरसोय दूर करावी.’’राणी जांभळे म्हणाल्या, ‘‘एक ना अनेक कामानिमित्त आम्हा महिलांना नित्याने घराबाहेर जावे लागते. परिसरात कोठे महिला स्वच्छतागृह नसल्यामुळे आम्हा महिलांना त्रास सहन करावा लागतो.’’(प्रतिनिधी)