शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटी’तल्या तरुणाईची निवासासाठी पुण्याला पसंती

By admin | Updated: August 24, 2015 03:01 IST

विद्येच्या माहेरघरात येऊन शिकण्यासाठी जसे देशभरातील विद्यार्थी इच्छुक असतात आता तसेच चित्र आयटीक्षेत्राबाबतही दिसून येत आहे. बेंगलोर, चेन्नईच्या तुलनेत स्वस्त

पुणे : विद्येच्या माहेरघरात येऊन शिकण्यासाठी जसे देशभरातील विद्यार्थी इच्छुक असतात आता तसेच चित्र आयटीक्षेत्राबाबतही दिसून येत आहे. बेंगलोर, चेन्नईच्या तुलनेत स्वस्त घरे, उत्तम हवामान आणि आवश्यक सुविधा यांमुळे आयटीकरांची पहिली पसंती पुणे शहरालाच मिळत असल्याचे नॅसकॉमच्या एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. नॅशनल असोसिएशन आॅफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज (नॅसकॉम) या आयटी क्षेत्रातील शिखर संस्थेने एटी करनी या नावाने सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद यांसारख्या मेट्रो शहरांच्या तुलनेत पुणे हे राहण्याच्या दृष्टीने १० ते ११ टक्क्यांनी स्वस्त आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण पुण्याला पसंती देत असल्याचे चित्र आहे, असे म्हटले आहे. पुण्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून स्थायिक झालेले वैभव म्हात्रे हे आयटीक्षेत्रातील तंत्रज्ञ म्हणाले, सुरुवातीला मी काही काळ चेन्नईमध्ये स्थित होतो. त्यानंतर मला लग्न करून राहण्यासाठी एक जागा हवी होती. परंतु जेव्हा अन्य शहरांची पुण्याशी तुलना केली तेव्हा पुणे हे इतर आयटी शहरांच्या तुलनेत अजूनतरी स्वस्त असल्याचे दिसले. त्यामुळे मी या शहराला प्राधान्य दिले. सॉफ्टवेअर आयटी पार्कमध्ये एका मोठ्या कंपनीत कार्यरत असणारे राकेश वैद्य म्हणाले, माझी पुण्यात बदली झाली तेव्हापासून मला आता दुसऱ्या शहरात जावेसे वाटत नाही. इथल्या वातावरणाशी मी जुळलो आहे. पुण्यात परदेशी आणि भारतीय अशा दोन्ही प्रकारच्या आयटी कंपन्यांचा वेगाने विस्तार होत आहे. गेल्या वर्षभरात पुण्यात आयटी क्षेत्रात ५ - ६ मोठ्या परदेशी कंपन्यांनी बस्तान बसवले आहे. (प्रतिनिधी)