पुणे हादरलं..! क्लासला सोडलेली बहीण बेपत्ता अन् खडकवासल्याच्या जंगलात दोन मृतदेह, नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:07 IST2025-07-11T17:07:01+5:302025-07-11T17:07:47+5:30

१६ वर्षीय बहिणीला क्लाससाठी सोडलं होतं. मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

pune news my sister was kidnapped by an unknown person; My sister had filed a complaint with the police | पुणे हादरलं..! क्लासला सोडलेली बहीण बेपत्ता अन् खडकवासल्याच्या जंगलात दोन मृतदेह, नेमकं काय घडलं

पुणे हादरलं..! क्लासला सोडलेली बहीण बेपत्ता अन् खडकवासल्याच्या जंगलात दोन मृतदेह, नेमकं काय घडलं

पुणे : पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या वेगवेगळ्या बाजू समोर येत आहे. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे तीन वर्षापासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीने काल पोलिसात फिर्याद दिली होती

मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी फिर्यादी यांनी त्यांच्या १६ वर्षीय बहिणीला क्लास साठी सोडलं होतं. मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दरम्यान एका संशयित मुलाचा देखील तपास याप्रकरणात करायला सुरुवात केली. तो मुलगा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्याचा मोबाईल फोन बंद होता. आज खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात २ मृतदेह मिळून आल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी धाव घेत याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना कळवली. या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

फोन स्विच ऑफ होता 

सध्या राहणार महादेवनगर मांजरी मूळ राहणार रावळगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर लोकेशन घेतले असता ते सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान तरुणाचा मोबाईल फोन स्विच ऑफ होता. मुलीकडे मोबाईल नव्हता. मुलाच्या मूळ गावी तेथील सरपंच मुलाचा भाऊ यांना फोन करून मुलाबद्दल माहिती घेतली असता तो तेथे नव्हता. त्यांना सुद्धा संपर्क साधून कायदेशीर बाजू समजावून सांगितले.

विषप्राशन करून संपवले जीवन

खडकवासला परिसरातील जंगलात विष प्राशन करून दोघांनी आत्महत्या केली. ज्या ठिकाणी आत्महत्या केली. त्याठिकाणी पोलिसांना कुठली ही सुसाइड नोट मिळाली नसून विषाचा डबा मिळून आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: pune news my sister was kidnapped by an unknown person; My sister had filed a complaint with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.