शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! घरगुती गणरायाला चिंचवडमध्ये निरोप 

By विश्वास मोरे | Updated: September 6, 2025 20:23 IST

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश भक्तांनी गणरायाला निरोप दिला. गुलाल विरहित आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सवावर भर दिला आहे. 

पिंपरी: "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..." असा जयघोष करत अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश भक्तांनी गणरायाला निरोप दिला. गुलाल विरहित आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सवावर भर दिला आहे. 

गेले दहा दिवस शहरातील वातावरण गणेशमय झाले होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आज सकाळपासूनच घरगुती गणरायाचे विसर्जन केले जात होते. पवना नदी तीरावरील चिंचवड येथील विसर्जन घाटावर कृत्रिम हौद निर्माण केले होते. त्या ठिकाणी येऊन गणेश भक्त विसर्जन करत होते. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने मूर्ती दान ही स्वीकारले जात होते. दुपारी एक नंतर घाटावरील गर्दी वाढू लागली. सायंकाळी साडेसहापर्यंत मोठ्या प्रमाणावर घरगुती गणरायाचे विसर्जन करण्यात आले. चिंचवडच्या मिरवणुकीची तयारी 

गणेशोत्सवा चिंचवडची मिरवणूक लक्षवेधी असते. चिंचवड गावातील चापेकर चौकामध्ये सहा रस्ते येतात. या सर्व मार्गावरून मिरवणुका चाफेकर चौकात येऊन तिथून जकात नाका मार्गे पवना नदी घाटावर जातात. या ठिकाणी महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सज्जता ठेवण्यात आली आहे. महापालिका आणि पोलिसांच्या वतीने चौकामध्ये स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे स्वागत करण्यात येत होते.  त्याचबरोबर या मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष यांच्यावतीने ही या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कक्ष उभारले आले आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून चौकात वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे. त्याचबरोबर पवना नदीचे प्रदूषण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे नदी घाटावर बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. घाटावरच निर्माल्य  कुंड ठेवण्यात आले आहे त्या ठिकाणी निर्माल्य स्वीकारले जात आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन केले आहे.  

पावसाची उघडीप गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित !

अधून  मधून हलक्या सरी बरसत असले तरी विसर्जनाच्या दिवशी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे दिसून आले. सायंकाळच्या सुमारास कुटुंबातील अबाल वृद्धाचे सर्व सदस्य गणरायाला निरोप देण्यासाठी घाटावर येत असल्याचे दिसून आले. चिंचवडची मिरवणूक लक्षवेधी असते.  मात्र अजून ही मिरवणूक सुरू झालेली नाही. एक-दोन छोटी गणेश मंडळ विसर्जनासाठी येत आहेत. चिंचवड परिसरातील मान्यवर गणेश मंडळांची विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असल्याची दिसून आले. मंडळांनी भव्य असे देखावे सादर करण्याचे नियोजन केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सव