वाद विकोपाला गेला, आईवरून शिवीगाळ थांबव म्हणताच...; तरुणाने दगडाने ठेचून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 10:46 IST2026-02-06T10:45:12+5:302026-02-06T10:46:52+5:30

- पवार रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर चव्हाण याने स्वत: पोलिसांना फोन करून माहिती दिली.

Pune Crime When his mother told him to stop abusing him he crushed himself with a stone | वाद विकोपाला गेला, आईवरून शिवीगाळ थांबव म्हणताच...; तरुणाने दगडाने ठेचून केला खून

वाद विकोपाला गेला, आईवरून शिवीगाळ थांबव म्हणताच...; तरुणाने दगडाने ठेचून केला खून

पिंपरी : आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने डोक्यात दगड घालून एकाचा खून केल्याचे समोर आले आहे. मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या सोमाटणे फाटा (ता. मावळ) परिसरात गुरुवारी (दि. ५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. संतोष पवार असे खून झालेल्याचे नाव आहे.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी चव्हाण (वय २५, रा. गहुंजे, शिरगाव) असे संशयिताचे नाव आहे. संतोष पवार हा सोमाटणे फाटा येथील पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या मोकळ्या मैदानात थांबला होता. त्यावेळी तेथून सनी चव्हाण जात असताना संतोषने त्याला शिवीगाळ केली. शिव्या देऊ नको, असे सनी याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही संतोषने शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने सनीने डोक्यात दगड मारल्याने संतोष गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

संशयिताने स्वत: पोलिसांना दिली माहिती

पवार रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर चव्हाण याने स्वत: पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सनी याला ताब्यात घेतले. तसेच संतोषला रुग्णालयात दाखल केले. त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही भेट दिली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मद्यपानावरून खून?

घटनास्थळी मद्यपानाचे साहित्य आढळून आल्याने, दारू पिताना झालेल्या वादातून हा खून झाल्याची शक्यता आहे का? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. खून झालेल्या पवार याच्यासोबत इतर काहीजण मद्यपान करत होते का, तसेच वाद नेमका कशावरून झाला, याचाही तपास पोलिस करत आहेत.

Web Title : विवाद बढ़ा: माँ के अपमान पर युवक की हत्या

Web Summary : सोमाटने में एक व्यक्ति की हत्या 25 वर्षीय युवक ने माँ को अपमानित करने को लेकर हुए विवाद के बाद कर दी। आरोपी सनी चव्हाण ने पुलिस को सूचना दी और उसे गिरफ्तार कर लिया गया। पुलिस जांच कर रही है कि क्या शराब एक कारक थी।

Web Title : Argument Escalates: Man Killed After Mother Insult Dispute.

Web Summary : A man in Somatane was murdered by a 25-year-old after an argument involving insults to the suspect's mother. The suspect, Sunny Chavan, informed the police and was arrested. Police are investigating if alcohol was a factor.