Pune Crime : बेकायदा आणि चढ्या दराने सिलिंडर विक्री करणाऱ्या हिंजवडीतील गॅस एजन्सीला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 11:26 IST2026-03-29T11:26:27+5:302026-03-29T11:26:53+5:30

- पुरवठा आणि वितरण तत्काळ प्रभावाने बंद; नियमभंगावर जिल्हा प्रशासनाची कारवाई

Pune Crime Gas agency in Hinjewadi busted for selling cylinders illegally and at high prices | Pune Crime : बेकायदा आणि चढ्या दराने सिलिंडर विक्री करणाऱ्या हिंजवडीतील गॅस एजन्सीला दणका

Pune Crime : बेकायदा आणि चढ्या दराने सिलिंडर विक्री करणाऱ्या हिंजवडीतील गॅस एजन्सीला दणका

पुणे : बेकायदा आणि चढ्या दराने गॅस सिलिंडर केल्याप्रकरणी हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारतगॅस या एजन्सीवर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. एजन्सीला तत्काळ पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, वितरणाचा परवानादेखील रद्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे.

या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे. मात्र, गुरुवारी (दि. २६) सिलिंडर वितरण करताना राज्य सरकारने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलिंडर वाटप केल्याचे आढळले. तसेच अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने जादा दराने सिलिंडर विक्री केल्याचेही निदर्शनास आले आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात येत आहे. तसेच, या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांना दिले आहेत.

Web Title : हिंजवडी गैस एजेंसी पर अवैध सिलेंडर बिक्री और अधिक शुल्क का जुर्माना।

Web Summary : हिंजवडी की श्री लक्ष्मी भारतगैस पर अवैध सिलेंडर वितरण और अधिक कीमत वसूलने पर कार्रवाई। आपूर्ति निलंबित, लाइसेंस रद्द करने की तैयारी। एजेंसी ने प्राथमिकता वाले वितरण नियमों का उल्लंघन किया और ग्राहकों से अधिक शुल्क लिया, जिससे सार्वजनिक व्यवस्था बाधित होने की आशंका थी। जिलाधिकारी ने तत्काल कार्रवाई का आदेश दिया।

Web Title : Hinjewadi Gas Agency penalized for illegal cylinder sales and overcharging.

Web Summary : Hinjewadi's Shree Laxmi Bharatgas faces action for illegal cylinder distribution and overpricing. Supply suspended, license revocation pending. The agency violated prioritized distribution rules and overcharged customers, potentially disrupting public order. District Collector ordered immediate action.