Pune Crime: ६७ वर्षीय नराधमाकडून ५ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:56 PM2021-10-26T12:56:41+5:302021-10-26T13:05:54+5:30

वासनेच्या आहारी गेलेल्या नराधमांकडून तरुणींबरोबरच लहान चिमुरड्यांवरही लैंगिक अत्याचार होण्याच्या प्रकरणात वाढ

Pune Crime A 67-year-old man sexually assaulted a 5-year-old girl | Pune Crime: ६७ वर्षीय नराधमाकडून ५ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

Pune Crime: ६७ वर्षीय नराधमाकडून ५ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

Next
ठळक मुद्देआरोपीला न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली

पिंपरी : पुण्यासहीत पिंपरी - चिंचवडमध्ये मुलींच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. वासनेच्या आहारी गेलेल्या नराधमांकडून तरुणींबरोबरच चिमुरड्यांवरही लैंगिक अत्याचार होण्याच्या प्रकरणात वाढ होत आहे. मागील दोन, तीन महिन्यापासून शहरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यातच पिंपरीत ५ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ६७ वर्षीय नराधमाने घृणास्पद कृत्य केले आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी ही घटना घडली.

शशिकांत आबासाहेब तापकीर (वय ६७), असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याला न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने रविवारी (दि. २४) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाच वर्षीय मुलीला त्याच्या दुचाकीवरून  पेरूच्या बागेतील गोठ्यात घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

Web Title: Pune Crime A 67-year-old man sexually assaulted a 5-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app