शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

रमेश रेड्डी हत्या प्रकरण: ‘तो' पळत होता… पण संशयित थांबले नाहीत..! २१ गोळ्यांनी देहूरोड हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:18 IST

 जीव वाचवण्यासाठी पळाला, तरी पाठलाग करून गोळ्या झाडल्या

पिंपरी : तीन महिन्यांपूर्वी धमकी देऊन पाळत ठेवून संशयितांनी रमेश रेड्डी (रा. देहूरोड) याचा भर रस्त्यात खून केला. रमेश आणि त्याचा मित्र मंगळवारी (दि. २८ एप्रिल) रात्री देहूरोड येथील संतोष स्वीट मार्टच्या मागील कपड्यांच्या दुकानात गेले होते. कपडे घेऊन दुचाकी सुरू करत असतानाच मोटारीतून आणि दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्यांना घेरले. संशयितांच्या हातात पिस्तूल आणि कोयता होता.संशयितांनी शिवीगाळ करत रमेश रेड्डीकडे धाव घेतली. परिस्थिती ओळखताच रमेश आणि त्याच्या मित्राने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील नागरिक भीतीने सैरावैरा पळू लागले. रमेश जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. तरीही संशयितांनी त्याचा पाठलाग करत पाठीमागून गोळ्या झाडल्या.

प्राथमिक माहितीनुसार, त्याच्यावर २१ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील नऊ गोळ्या शरीरात लागल्या. त्यानंतर डोक्यात कोयत्याने वार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम देहूरोड येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.रमेशला रात्री वायसीएम रुग्णालयात आणताच मोठ्या प्रमाणावर समर्थक, नातेवाईक आणि नागरिकांची गर्दी झाली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी शांततेचे आवाहन करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

नगरसेवकावरही झाला होता गोळीबारदेहूरोड परिसरात सात वर्षांपूर्वी याच चौकात तत्कालीन एका नगरसेवकावर गोळीबार झाला होता. आता त्याच ठिकाणी रमेश रेड्डीचा खून झाल्याने भीतीचे वातावरण आहे.वर्षभरात दोन्ही भावांचा खूनरमेश आणि त्याचा भाऊ विक्रम यांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. हातगाडीवर इडली विक्री करून त्यांच्या आईने कुटुंबाचा सांभाळ केला. रमेशचा भाऊ विक्रम रेड्डी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी वाढदिवसाच्या कार्यक्रमात गेला होता. त्यावेळी तेथे आलेल्या संशयितांनी वाद घालून गोळीबार करून त्याचा खून केला होता. वर्षभरात दोन्ही भावांचे खून झाल्याने देहूरोड हादरले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Ramesh Reddy Murder: 21 Shots Shatter Dehu Road; Suspects Chase

Web Summary : Ramesh Reddy was brutally murdered in Dehu Road by assailants who fired 21 shots, hitting him nine times. He was chased and attacked with a sickle after an initial attempt to escape. His brother was also murdered a year prior, causing widespread fear.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याdehuroadदेहूरोड